Home > रिपोर्ट > राजकीय पटलावर आदिवासी समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या आमदार दिपिका चव्हाण

राजकीय पटलावर आदिवासी समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या आमदार दिपिका चव्हाण

राजकीय पटलावर आदिवासी समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या आमदार दिपिका चव्हाण
X

फडणवीस सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना बागलाण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार दिपिका चव्हाण यांनी सभागृहात काही मुद्दे उपस्थित केले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित अनुदानासंबंधी न्याय मिळावा अशी मागणी केली. तसेच मतदारासंघातील वारंवार पाठपुरवठा करत असलेल्या पुनद नदीचा प्रश्न सभागृहात मांडला असून तो मार्गी लागला आहे. यामुळे सटाणा शहराला हक्काचं पाणी मिळणार असल्याच समाधान त्यांनी व्यक्त केलं.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपयोग गरजू रुग्णांना असून माझ्या मतदारसंघातील अनेक रुग्ण केवळ पैशाअभावी उपचार घेऊ शकत नाही तरी या निधीअंतर्गत या रुग्णांना तात्काळ मदत करण्यात यावी. तर पावसाळा सुरु झाल्यामुळे मतदारसंघातील गावांचा संपर्क तुटत असून या भागात महत्त्वाच्या नद्या उगम पावतात तरी या नद्यांवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे जेणे करुन लोकांचे जनजीवन विस्कळीत होणार नाही. तसेच बागलाण तालुक्यातील पंचायत समितीची इमारत ब्रिटिशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तात्काळ याकडे लक्ष द्यावे असा मुद्दा उपस्थित करत तलाठी पदे भरण्यात यावी जेणेकरुन बळीराजांची अडचण दूर होईल.

असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दिपिका चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केले असून काही प्रश्नांना सकारात्मकरित्या साथ मिळाली असून त्यांची कामे ही सुरु झाली आहे.

पाहा सभागृहात उपस्थित केलेले मुद्दे

https://youtu.be/d-Hcwxs4NQI

Updated : 9 July 2019 5:19 PM IST
Next Story
Share it
Top