Home > रिपोर्ट > लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी जगायचं कसं

लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी जगायचं कसं

लॉक डाऊन करण्याचा निर्णय योग्यच.. पण गरिबांनी जगायचं कसं
X

कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवस लॉक डाऊन करण्याचा पंतप्रधान यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण हातावर पोट असलेल्या गरिबांनी कसं जगायचं? असा सवाल राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी लॉक डाऊनची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यापुर्वी रुपाली चाकणकर यांनी भाईयो और बहनो असं बोलून काहीच फरक पडणार नाही. अन् देश बदल रहा हे असं तर अजिबात बोलू नका. असं म्हटलं होत.

कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवस लॉक डाऊन करण्याचा पंतप्रधान यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण यात शेतकरी, हातावर पोट असलेले, कामगार, यांच्या विषयी अधिक स्पष्टता येणे गरजेचे होतं. कारण या सर्वांच्या जगण्याचा विचार करावा लागेल,” असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

Updated : 25 March 2020 2:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top