Home > रिपोर्ट > २१% तरूणी आणि ३०% तरूण दिवसात अनेकवेळा करतात सेक्सचा विचार; टिंडरचा सर्व्हे

२१% तरूणी आणि ३०% तरूण दिवसात अनेकवेळा करतात सेक्सचा विचार; टिंडरचा सर्व्हे

२१% तरूणी आणि ३०% तरूण दिवसात अनेकवेळा करतात सेक्सचा विचार; टिंडरचा सर्व्हे
X

सेक्स आणि इंटिमसीवर देशातील तरूणांचे काय विचार आहेत हे जाणून घेण्यासाठी डेटींग अँप टींडरने एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये देशातल्या ७ शहरांमधल्या १५०० सिंगल लोकांनी सहभाग घेतला होता. जनरेशन झेड (Generation Z) म्हणजेच ज्यांचा जन्म १९८१ ते १९९६ या काळात झाला आहे अशा मंडळींनी या सर्व्हेत मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

यातील बहुतांश लोकांनी रिलेशनशीपमध्ये नवनवीन गोष्टी करायला आवडतील असं म्हटलंय. याशिवाय २१ % तरूणी आणि ३० % तरूण दिवसात अनेकवेळा सेक्सचा विचार करतात असंही या सर्वेक्षणातून समोर आलंय.

टिंडरच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या ठळक बाबी

८१ % सिंगल लोकांनी रिलेशनशीपमध्ये सेक्स गरजेचा असल्याचं म्हटलंय. यामध्ये ७९ % पुरूष आणि ८१ महिलांचा समावेश आहे. १८-२२ वयोगटातील ३८ % आणि २८ ते ३४ वयोगटातील ५६ % सिंगल सेक्स गरजेचा आहे असं म्हणतात.

दिवसातून कितीवेळा सेक्सचा विचार करता असं विचारल्यावर धक्कादायक आकडेवारी समोर आली. ३० % पुरूष आणि २१ % महिलांनी दिवसातून अनेकवेळा सेक्सचा विचार करत असल्याचं मान्य केलं. यासोबतच ३० % पुरूष आणि २३ % महिला दिवसात किमान एकवेळा तरी सेक्सचा विचार करतात.

सेक्सला नकार देण्यासाठी कारणं देता का? या प्रश्नावर ७१ % लोकांनी हो असं उत्तर दिलं. १० पैकी ८ महिलांनी सेक्स न करण्यासाठी कारणं दिलेली आहेत. तर ६४ % पुरूषांनीही सेक्सला नकार देण्यासाठी वेगवेगळी कारणं दिली आहेत.

सर्व्हेक्षणात कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही अधिक रोमँटीक होता असं विचारल्यावर ४२ % लोकांनी हॉलीडे आणि प्रवास असं उत्तर दिलं. ४३ % महिला आणि ३७ % पुरूषांनी चांगलं जेवण आणि ३५ % महिला आणि ३१ % पुरूषांनी भेटवस्तू असं उत्तर दिलं.

सेक्ससाठी रात्र ही योग्य वेळ असंल्याचं ६० % लोकांनी सांगतिलं तर ३२ % लोकांनी सेक्स कधीही केला तरी चागलं असल्याचं म्हटलंय. शनिवार हा सेक्ससाठी सर्वात योग्य आणि सोमवार सर्वात अयोग्य दिवस असल्याचं मतंही समोर आलंय.

सेक्सदरम्यान काही नवीन प्रयोग करता का या प्रश्नावर ७९ % लोकांनी होय असं उत्तर दिलं. केवळ २१ % लोकांनीच पारंपारिक पद्धतीने सेक्स करत असल्याचं सांगितलं. जवळपास ८० % महिला आणि पुरुषांनी सेक्समध्ये काहीतरी नवं करणं गरजेचं असल्याचं मत मांडलं.

याशिवाय कॅज्युअल डेट आणि सिरीयस रिलेशनशीप यापैकी कोणत्या नात्यात काहीतरी नवं करायला आवडेल असं विचारल्यावर ३७ % लोकांनी कॅज्युअल रिलेशनशीपमध्येच प्रयोग करायला आवडतील असं उत्तर दिलं. २४ % लोकांचं म्हणणं होतं की ते सिरीयस रिलेशनशीपमध्ये नव्या गोष्टी करू शकतात.

यासोबत समोर आलेली आणखी एक बाब म्हणजे ४८ % लोकांनी हे मान्य केलं की सेक्सदरम्यान त्यांनी एकदातरी चरमसुख मिळालेलं नाही. यामध्ये ५० % महिला आणि ४६ % पुरूषांचा समावेश आहे. ५२ % लोकांनी सांगितलं की त्यांनी कधीच फेक ऑर्गज्म नाही केलं.

मोनोगॅमी म्हणजेच एकाच व्यक्तीसोबत सेक्स करण्याबाबत विचारलं असता ७० % महिलांनी आणि ५५ % पुरूषांनी हे योग्य असल्याचं म्हटलं आहे. ३६ % लोकांनी मोनोगॅमीबद्दल साशंक सांगू शकत नाही असं उत्तर दिलं. १८ ते २२ वयोगटातील ५५ % तरूण-तरूणी एकाच जोडीदारासोबत राहू ईच्छीतात तर २८ ते ४२ वयोगटात असं वाटणाऱ्यांची टक्केवारी ६६ इतकी आहे.

एकंदरित टिंडरच्या या सर्व्हेक्षणात तरूणांनी सेक्स आणि त्यासंबंधीच्या आपली मतं बेधडकपणे व्यक्त केली. विशेषतः मुलांसोबत मुलींनीही नातेसंबंध, सेक्स याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या गोष्टीबद्दल आजही समाजात मोकळेपणाने बोललं जात नाही तिथे अशाप्रकारचा प्रयोग महत्वाचा आहे.

Updated : 17 Nov 2019 8:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top