Home > Max Woman Blog > पोरांनो या मुलींपासून सावधान!

पोरांनो या मुलींपासून सावधान!

पोरांनो या मुलींपासून सावधान!
X

मी ज्या तालुक्यात राहाते तिथे या दोन पोरी राहतात. वडील नाहीत. आईच्या पायाला बारा टाक्याची जखम झालेली. यामुळे घराची जबाबदारी यांच्या खांद्यावर. एक पोरगी तीन किलोमीटर चालत येऊन दूध विकते. तर एक बैलगाडी हाकत नऊ जनावरांना गवत आणत, धार काढणे, पिकातील दारे धरणे, अशी शेतीतील सर्व कामं या तरुण पोरी करतात.

कुणाची हैक नको की दैक नको. असं त्यांचं रोजचं रुटीन असतं.

हे मी माँर्निग वाँक ला जाता येता बघत असते. कधी कधी तरी आमचं बोलणं व्हायचं. तर झालं असं की, या पोरी हातात विळे घेऊन एका गावात जात. तीन पोरांना शोधत उभ्या रस्त्याने शोधत होत्या आणि तेही शिव्या देत. गावात काही लोकांनी संबंधित पोरं या गावचे नाहीत असं सांगितले. पण काही लोकांनी मात्र इत्यंभुत माहीती दिली. आणि मग ही माहिती घेऊन त्या ठाण्यात गेल्या. आम्ही तिथे गेल्यानंतर काय झालं? असं विचारताच आम्ही रानात असताना तिन पोरं येऊन आम्हाला मोबाईल नंबर मागत आहेत.

आम्ही मोबाईल वापरत नाहीत असं सांगितलं तरीही ऐकायला तयार नव्हते. यामुळे शिव्या देताच एका तरुणाने त्यातील एकीला मायघाले म्हणत शिवी दिली. यामुळे या दोघी जणी या पोरांच्या पाठीमागे दांडे(लाकुड)घेऊन लागल्या. त्यांनी ते पोरं असे दामटीले की त्यांचा तो अवतार बघून पोरं पळून गेले.

त्या पोरी त्यांच्यापाठीमागे एवढ्या पळत होत्या की, पळता पळता एकीच्या पायात मोठं लट धसकट घुसलं. रक्ताळलेला पाय घेऊन त्या दोघी बहिणींनी त्या तिघांचा पिच्छा केला. पण त्यांची नावं शोधण्यात त्यांचे तिन दिवस गेले. पैकी,एका पोराची तोंडओळख असल्याने त्यांनी त्या पोरांचा शोध लावला. ठाण्यात आल्यानंतर मात्र, तक्रार द्यायची का? असं विचारल्यास त्यांचं म्हणंन आलं की, आमची त्यांनी माफी मागावी. ठाण्यात लिहून द्यावं आणि पोलीसांनी आमच्या समोर दोन दोन फटके द्यावे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली आणि दोन दोन फटके देत मचलांकडुन लिहुन घेत त्या मुलींची माफी मागायला लावली.

अशा निबर पोरी माझ्या आसपास घडत आहेत. हे बघून खरच आनंद होतोय आणि असे पुरुष बदलत नसतील तर आता पोरींनीच स्वतः बदललं पाहीजे. असा जणू त्या संदेशच देत आहेत. तोंडओळख हाय म्हणून फोन नंबर मागणं, पोरींची इच्छा नसताना जबरदस्ती गोंडा घोळण्याचा प्रसाद सुंद्रीतुन फटक्यातुन मिळू शकतो हे टुकार पोरांनी लक्षात घेतलं पाहीजे. पायात धसकट घुसलेला तो फोटो आहे हे बघुन पोरीच्या मनात किती राग आला असेल हे कळून येईलच...

#सत्यभामा_सौंदरमल

निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था

माजलगाव बीड

Updated : 24 Sep 2020 7:23 AM GMT
Next Story
Share it
Top