Home > रिपोर्ट > पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात ३७० तोफांची सलामी

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात ३७० तोफांची सलामी

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात ३७० तोफांची सलामी
X

पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने आज दसऱ्यानिमित्त भगवान गडावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली आहे.

या कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी बीडमध्ये ‘कलम ३७०’ रद्द केल्याबद्दल ३७० तोफांची सलामी दिली. तर शहा यांचे ३७० तिरंगी झेंड्यांनी स्वागत केले. दसऱ्यानिमित्तानं भगवानबाबा गडावर भाविकांची गर्दी जमली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा प्रचाराचा नारळ फोडतील. भाजपची ही पहिलीच प्रचार सभा आहे.

तसेच खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथगड ते सावरगाव अशी रॅली काढून भव्य शक्तीप्रदर्शन केलं. पंकजा मुंडे परळीमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना धनंजय मुंडे यांचे कडवे आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Updated : 8 Oct 2019 11:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top