धाकड गर्ल झायरा म्हणते... बॉलीवूड सेहत के लिए हानिकारक है!
X
धाकड गर्ल अर्थात ‘दंगल’ या चित्रपटातून २०१६ ला बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री झायरा वसीम हिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने बॉलिवूड सोडण्याचे जे कारण दिले आहे. ते वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल.
झायराने तिच्या सोशल मीडियावरील फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोठी पोस्ट लिहिली असून या पोस्टमध्ये तिने ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं म्हणत या पाच वर्षांत तिचं आयुष्य कशाप्रकारे बदललं याविषयी तिने सांगितलं आहे. या क्षेत्रात मला प्रसिद्धी, प्रेम सर्वकाही मिळालं. या क्षेत्रासाठी जरी मी योग्य असली तरी मी इथे खूश नाही. असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. झायराच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त करत तिच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘झायराच्या निर्णयावर किंवा तिने केलेल्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणारे आपण कोण? आहोत असं म्हणत
https://twitter.com/OmarAbdullah/status/1145224495457718273
आपल्या इच्छेनुसार जगण्याचा झायराला पूर्ण हक्क आहे. तिने जो काही निर्णय घेतला आहे त्याने ती आनंदी असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो,’ असं ट्विट करत अब्दुल्ला यांनी झायराच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
https://www.instagram.com/p/BzUBXYrlsml/?utm_source=ig_web_copy_link