Home > रिपोर्ट > पुण्याची दामिनी फ्लाईंग ऑफिसर...

पुण्याची दामिनी फ्लाईंग ऑफिसर...

पुण्याची दामिनी फ्लाईंग ऑफिसर...
X

पुणे येथील दामिनी देशमुख हिची वायुदलातील 'फ्लाईंग ऑफिसर' पदासाठी निवड झाली आहे.या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येत तिने दैदीप्यमान यश संपादन करून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. फ्लाईंग ऑफिसर पदासाठी 'कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट' घेतली जाते.देशभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात.त्यापैकी दीड-ते दोन हजार विद्यार्थी यशस्वी होतात.त्या नंतर समुह चर्चा,नेतृत्व गुण,परिस्थिती हाताळणे,मैदानी खेळ,अशी व्यक्तीमत्व चाचणी , वैद्यकीय चाचणी घेतली जाते.त्यानंतर 'एअरफोर्स सिलेक्शन बोर्डा'कडून मुलाखत घेतली जाते.आणि त्यातून अंतीम निवड केली जाते.यासर्व अवघड प्रक्रिया पार पाडून दामिनी देशमुख हिने हे यश संपादन केले आहे.या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येण्याचे प्रमाण तीन ते चार टक्केच असते.

दामिनी देशमुखचे पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत झाले आहे.त्यानंतर तिने बी.ई.(मेकॅनिकल)पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली .

हैदराबाद येथील एअरफोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ती फ्लाईंग ऑफिसर म्हणून रूजू होणार आहे.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ती या प्रशिक्षणासाठी रवाना होईल. दामिनी ही पुणे येथील सह धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांची कन्या तर ज्येष्ट पत्रकार एस.एम.देशमुख यांची पुतणी आहे.दामिनीने महाराष्ट्रातील मुला मुलींपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Updated : 7 Dec 2019 5:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top