Home > Max Woman Blog > पोस्टवेडिंग शुट..!

पोस्टवेडिंग शुट..!

पोस्टवेडिंग शुट..!
X

आज आमच्या वैवाहिक जीवनाचा 15 वा वर्धापन दिन..!

प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीशक्तींना खुप मोठं स्थान आहे,आपली आई,पत्नी,मुलगी,या जीवनातील तीन प्रमुख पावरपॉईंट असतात माझ्या जीवनात या पावरपॉईंट सोबतच सर्व बहिणी,छोट्या भावजया पुतणी,भाच्ची,सार्वजनिक जीवनातील अनेक माता भगिनी या अनेक स्त्री शक्ती माझ्या पावरपॉईंट आहेत,असे मी समजतो.नविन वर्ष 2020 हे 20 व 20 या समसमान संख्येनी तयार झालेले आहे यामुळे स्त्री पुरुष समानतेचा गाणितीक संदेश देखील या वर्षात आहे,त्यामुळे हे वर्ष स्त्री पुरुष समानतेचे आहे असे मी व्यक्तिशः मानतो.

माझ्या जीवनातही सर्वात मोठा पावर पॉईंट म्हणजे माझी पत्नी,आज आमच्या वैवाहिक जीवनाला 15 वर्षे पूर्ण झाली,बघता बघता काळ कसा पुढे गेला ते कळालेच नाही.धकाधकीचे कार्यबाहुल्याचे राजकीय जीवन मी स्वीकारल्यामूळे आणि मागच्या 15 वर्षातील माझ्या विविध राजकीय जबाबदाऱ्यांमुळे मी कौटुंबिक जबाबदाऱ्यांना,मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी,जितका वेळ द्यायला पाहिजे होता तो देवू शकलो नाही पण कधी त्रागा न करता समजूतदारपणाने माझ्या पत्नीने घेतले.गेल्या पंधरा वर्षात आमच्यात कधी कुरबुर ना भांडण,खरच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच..!

आजकाल प्रीविडिंग शूट ला खुप महत्व आले आहे,गेल्या महिन्यात मी कुटुंबासोबत महाबळेश्वर ला होतो,असेच आम्ही साईट सीईंग करत असताना केट्स पॉईंट ला गेलो आणी तिथे आपल्या परळीचे प्रथितयश फोटोग्राफर राम भाले त्यांच्या चमूसह एक नियोजित नवदाम्पत्यांचा प्रिविडिंग शूट करण्यासाठी आले तेंव्हा त्यांनी आग्रहाने आमचे फॅमिली शूट केले आणि रामभाऊ मुळे अगदी आगंतुकरीत्या आमचे पोस्ट विडिंग शूट झाले,रामभाऊंनी अनेक छायाचित्रे घेतली माझ्यासाठी तो एक लाजराबूजरा अनुभवच होता पण पती पत्नीचा जिव्हाळा अश्याप्रकारच्या शूट मुळे जरुर वाढतो,त्यामुळे विविध लोकेशन वर जावून प्रीविड शूट होतात तसे पोस्ट विड शूट ही व्हावेत आणी सर्वांचे वैवाहिक जीवन असेच प्रेमाने वृद्धिंगत व्हावे हीच सदिच्छा..!

-बाजीराव धर्माधिकारी

Updated : 4 Jan 2020 9:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top