Home > रिपोर्ट > Coronavirus : घरातच राहुया, एकजुटीने करोनाशी सामना करुया

Coronavirus : घरातच राहुया, एकजुटीने करोनाशी सामना करुया

Coronavirus : घरातच राहुया, एकजुटीने करोनाशी सामना करुया
X

रात्रीचे ११ वाजले होते. एक अॅम्ब्युलन्स हळू हळू कॉलनीत शिरत होती आणि सगळीकडून टाळ्यांचा वर्षाव होऊ लागला. या टाळ्या होत्या आमच्या रिजन्सी इस्टेटमधल्या कोरोनाशी लढून जिंकलेल्या रहिवाशीसाठी.

३१ मार्चला आमच्याच बिल्डिंगमधे कोरोनाने प्रवेश केला. २२ बिल्डिंग्ज असलेलं रिजन्सी इस्टेट ही वसाहत सिल केली गेली. अजिबातच बाहेर पडायचं नाही ही तंबीही दिली गेली. दुपारी ४ वाजेपर्यंत लॉकडाऊन मधे असणारे हजारो रिजन्सीकर अचानक विजनवासात ढकलले गेलो. नुकतीच इथे रहायला आलेली मी नाही म्हटलं तरी भांबावलेच. उंबरठाच ओलांडायचा नाही आणि करोनीची डोक्यावर टांगती तलवार!!

हे ही वाचा | Coronavirus : कल्याण-डोंबिवलीच्या महापौर करणार रुग्णसेवा?

रिजन्सीच्या कमिटी मेंबर्सनी खूप व्यवस्थितपणे ही परिस्थिती हाताळली. महानगरपालिकेने संपूर्ण वसाहत सिल केल्यावर लगेचच निर्जंतुकीकरण केलं. आरोग्य कर्मचाऱ्यांकरवी आरोग्य सर्व्हे केला. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य चाचणी केली. दररोज प्रत्येक घरी जाऊन कोणी आजारी आहे का याची चौकशी केली जाते. ह्या सर्व प्रक्रियेमधे वसाहतीच्या कमिटीने पूर्ण सहकार्य महानगरपालिकेला दिलेले आहे.

इतकी मोठी वसाहत आणि हजारो लोकं घरात राहिली तर त्यांच्या दैनंदिन गरजांचं काय? कमिटिने वसाहत सिल केल्याबरोबर स्वयंसेवकांसाठी आवाहन केलं आणि प्रत्येक इमारतीतून अनेकजण उत्स्फुर्तपणे पुढे आले. दूध, भाज्या, किराणा यांच्यासाठी वेगवेगळ्या वेळा निश्चित झाल्या. ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडला आणि एका दिवसात रहिवाशांना सर्व वस्तुंचा पुरवठा सुरू झाला. व्यवस्थापन शास्त्राचा एक उत्तम नमुना या निमित्ताने अनुभवायला मिळाला.

हे ही वाचा | 14 लाख करदात्यांना फायदा, परताव्याची रक्कम 18000 कोटी

काल रात्री जेव्हा ग्रुपवर बातमी आली की करोनाशी यशस्वी लढत देऊन मंजुषाताई परत येताहेत सर्व रिजन्सीकरांनी त्यांचे स्वागत करायचं ठरवलं. ग्रुपवर मेसेज पाठवले गेले आणि आपापल्या बाल्कनीत उभं राहून टाळ्या वाजवून स्वागत करायचं ठरलं. रिजन्सीकरांसाठी हा महत्वाचा क्षण होता. एखाद्या संकटसमयी एकजुटीनं कशा प्रकारे वागायला हवं याचं प्रात्यक्षिक गेले काही दिवस सगळेजण अनुभवत होते. त्या एकजुटीचा परिपाक कालच्या स्वागतात दिसुन आला.

हे ही वाचा | Fact Check | व्हॉट्सअपमध्ये तिन्ही टिक √√√ लाल झाल्या तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा? वाचा ‘Red Tick√’ चं सत्य

घरातच राहुन रिजन्सी वसाहतीतील रहिवाशांनी करोनाशी यशस्वी दोन हात केले आहेत. हे सामर्थ्य आहे एकजुटीचे. घरातच राहुया, करोनाशी एकजुटीने सामना करुया. जिंकणार तर आपण आहोतच.

सिरत सातपुते

Updated : 9 April 2020 2:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top