Home > रिपोर्ट > पोलिस आयुक्त नांगरे पाटलांना ACP कडून मिळाले ‘हे’ आदेश, कोण आहेत हे ACP?

पोलिस आयुक्त नांगरे पाटलांना ACP कडून मिळाले ‘हे’ आदेश, कोण आहेत हे ACP?

पोलिस आयुक्त नांगरे पाटलांना ACP कडून मिळाले ‘हे’ आदेश, कोण आहेत हे ACP?
X

सध्या कोरोनाच्या लढाईत संपुर्ण नाशिककरांना आणि पोलिसांना आदेश देणाऱ्या विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनाच ACP स्कॉडने नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. हे स्कॉड म्हणजे 'एंटी कोरोना पोलिस' आहे आणि यात त्यांची मुलं सामील झाली आहेत. त्यांनी आपल्या वडीलांना ‘तुम्ही बाहेर सीपी असाल पण घरात आम्ही ACP आहोत’ म्हणत नियम पाळण्यास सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यात नाशिक जिल्ह्याधिकाऱ्यांनी एक खास विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिम सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विश्वास नांगरे पाटील आपल्या ट्वीटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत त्यांची मुलं घराच्या दारात उभी आहेत. मुलांनी आपल्या वडिलांना घरी आल्यानंतर घरात न घेता पहिला मोबाईल आणि हात सॅनिटाईज करण्याचे आदेश दिले आणि मगच घरात येण्याची ताकीद दिलीय. त्यांचा हा गमतीशीर व्हिडीओ आपणही आचरणात आणलाचं पाहिजे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/255126238996090/?t=2

कोरोना व्हायरस पासून सामान्य नागरिकांचं रक्षण करण्यासाठी राज्यात पोलिस दल दिवस रात्र कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना ताळ्यावर आणणं, निवारा नसलेल्यांना अन्नपाणी पुरवणं, आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांची काळजी घेणं अशा एक ना अनेक कामातुन ते कोरोनाशी लढत आहेत. अशा वेळी पोलिसांनीही काळजी घ्यायला हवी. पोलिसांप्रमाणेच अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणाऱ्यांना ACP स्कॉडने घरात येण्याआधी योग्य ती काळजी घेण्यास सांगणं गरजेचं आहे.

Updated : 19 April 2020 5:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top