Home > रिपोर्ट > धोकादायक! राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७४ वर; दोघांचा मृत्यू

धोकादायक! राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७४ वर; दोघांचा मृत्यू

धोकादायक! राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७४ वर; दोघांचा मृत्यू
X

राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या 63 वरुन आज 74 वर जाऊन पोहोचली आहे. एका रात्रीत 11 रुग्णांची वाढ झाली आहे. तर राज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. म्हणून हे शहर 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आज देशभरात पुर्ण पणे बंद पाळण्यात येत आहे.

राज्यसरकारनं मुंबई महानगर प्रदेशासह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या चार शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधं या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं व कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलं आहे. तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सुट्ट्या जाहीर केल्या असून फक्त 25 टक्केच कर्मचारी हजर राहतील असे आदेश दिले आहेत.

सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या चाचणीसाठी असलेल्या टेस्टींग लॅबची कमतरता भासत आहे. येत्या काही दिवसात 8 टेस्टींग लॅबची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे टेस्टींग केल्यानंतर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अतिदक्षतेचा रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकार करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी 22 मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा करत सर्व देशवासीयांना हा दिवस पाळण्याचं आवाहन केलं आहे. याविषयी राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही जनता कर्फ्यूचं समर्थन करताना महाराष्ट्राच्या जनतेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेस 100% टक्के प्रतिसाद दिला पाहिजे असं म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे, मुंबई, ठाण्यासह अन्य काही जिल्ह्यांमंध्ये जमावबंदी लागू केली असून नागरिकांनी अतिआवश्यक परिस्थितीतच घरातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत.

Updated : 22 March 2020 5:25 AM GMT
Next Story
Share it
Top