Home > रिपोर्ट > CoronaUpdate: फिलीपीन्स मधील ४००० भारतीय विद्यार्थी जायबंदी

CoronaUpdate: फिलीपीन्स मधील ४००० भारतीय विद्यार्थी जायबंदी

CoronaUpdate: फिलीपीन्स मधील ४००० भारतीय विद्यार्थी जायबंदी
X

जगभर कोरोना वायरसच्या (Corona Virus) दहशतीमुळे येत्या काळात सर्व देशांनी हवाई मार्गावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. फिलीपीन्स मध्ये ४००० भारतीय विद्यार्थी अडकलेले असून त्यांपैकी ८०० विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. या विद्यार्थ्यांना तात्काळ तिथुन भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती पाऊल उचलावीत अशी विनंती खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी लोकसभेत केली आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/2604063236529009/?t=0

अजूनही बऱ्यांच देशांमध्ये भारतीय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने अडकलेले आहेत. केंद्र सरकारही अशा नागरिकांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहे. फिलीपीन्समध्ये आतापर्यंत १८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

फिलीपीन्स सरकारने येत्या ७२ तासात हवाई मार्गावर बंदी करण्याचा निर्णय घेतला असून भारत सरकारही १५ तासात हवाई मार्ग बंद करणार आहे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना तिथुन बाहेर काढणं शक्य होणार नाही म्हणन त्वरित उपाययोजन कराव्यात अशी विनंती नवनीत राणा केली.

सोबतच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना आरोग्य मंत्रालयाकडून पोलिस, तहसिल व दळणवळण सेवेतील कर्मचाऱ्यांना N-95 मास्क आणि सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे.

Updated : 18 March 2020 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top