Home > रिपोर्ट > टेनिस सुपरस्टार व्हीनससला ज्युनियर'कोको'कडून पराभवाचा धक्का

टेनिस सुपरस्टार व्हीनससला ज्युनियर'कोको'कडून पराभवाचा धक्का

टेनिस सुपरस्टार व्हीनससला ज्युनियरकोकोकडून पराभवाचा धक्का
X

जिकंण्याची आणि काही तरी करून दाखवण्याची ईर्षा असल्यास काहीच अशक्य नाही. इंग्लंड सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये एका पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने, सात वेळा ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिस सुपरस्टार व्हीनस विलियमला पराभूत केले आहे. आतापर्यंत पाच वेळा विम्बल्डन स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या व्हीनसपेक्षा वयाने तब्बल २४ वर्षे लहान असलेल्या अमेरिकेच्या कोरी गॉफने व्हीनसला पराभूत करून तिने ही किमया साधली आहे. कोरी सर्वात लहान टेनिसपटू असून, तिने व्हीनसचा ६-४,६-४ अश्या सरळ सेट्समध्ये पराभव करीत प्रेक्षकांची दाद मिळविली.

कोण आहे ही कोको ?

कोरी अद्याप शाळेत शिकत असून, क्वालिफायिंग मॅच खेळण्याच्या एक रात्र आधी, ती तिच्या आगामी शालेय परीक्षेची तयरी करीत होती. कोरीच्या कारकिर्दीची धुरा टीम 8 मॅनेजमेंट कंपनीने सांभाळली असून, सुप्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडरर आणि त्याचा एजंट टोनी गॉडसिक यांची ही कंपनी आहे. रॉजर फेडररने ही कोरीच्या खेळाविषयी समाधान व्यक्त केले आहे. कोरी गॉफला कोको या टोपणनावानेही ओळखले जाते. सेरेना आणि व्हीनस विलियम्स या बहिणींना टेनिस खेळताना पाहून आपल्यालाही टेनिस खेळण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे कोरी म्हणते. सेरेना आणि कोरी यांचे प्रशिक्षक एकच असून, सेरेनानेही कोरीच्या खेळाचे मनापासून कौतुक करीत तिच्या विजयाबद्द्ल तिचे अभिनंदन केले आहे.

Updated : 4 July 2019 7:16 AM GMT
Next Story
Share it
Top