Home > Max Woman Blog > संजयजी तुम्हारा चूक्याच !!!

संजयजी तुम्हारा चूक्याच !!!

संजयजी तुम्हारा चूक्याच !!!
X

कंगणा रानावत आणि संजय राऊत यांचं वाकयुद्ध अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र, कंगना रानावत सारख्या अभिनेत्री ला संजय राउतांनी इतकं महत्त्व देणं योग्य होतं का? संजय राऊतांसारख्या वाकचातुर्य असणाऱ्या व्यक्ती कडून अशी विधानं योग्य होती का? या संदर्भात कॉंग्रेस नेत्या हेमलता पाटील यांनी थेट संजय राऊतांना पत्रच लिहिलं आहे.. त्या पत्रात त्या म्हणतात..

आदरणीय संजयजी राऊत साहेब,

साष्टांग दंडवत...

जाहीर पत्र लिहण्यास कारण की, गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबई मध्ये जे काही चालले आहे. ते या राज्याचा नागरिक म्हणून आमच्या सहनशक्ती च्या पल्याड आहे. आम्ही सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. अशी आमची गत करून घेणाऱ्या पठडीतील नसल्याने एकदाचे स्पष्टपणे बोलूनच टाकावे म्हणून हा पत्र प्रपंच.

एका कॉंग्रेस वाली ने शिवसेनेच्या नेत्यास लिहिलेले पत्र अनेकांच्या पचनी पडणार नाही. याची जाणीव मला आहे. पण वैयक्तीक मला शिवसेनेचे कधीच वावडे नव्हते. हे मी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. त्या मागची असंख्य कारणे देता येतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदरणीय बाळासाहेबांची असलेली रोखठोक भूमिका.

एखाद्याला आपले म्हटले की, कधीही त्याच्या पाठीत वार न करण्याची दिलदार भूमिका. मित्राला ही असा मित्र असल्याचा वाटणारा अभिमान आणि शत्रूलाही असा उमदा शत्रू समोर असल्याचा वाटणारा सन्मान. खरंतर आदरणीय वसंतदादांपासून कॉंग्रेस आणि शिवसेनेमध्ये कधीही टोकाचे वैर नव्हते. उलटपक्षी प्रबोधनकारांची जाज्वल पुस्तके वाचत आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची घणघणाती भाषणे ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो.

बाळासाहेबांनी आमच्या नेत्यांची अनेक कार्टून्स काढली किंवा अनेक वेळा बोचरी टीका केली. पण कॉंग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य पूर्व काळा पासूनच वडिलकीच्या भूमिकेत असल्यामुळे आणि कोणतीही गोष्ट बिघडविण्यापेक्षा घडविण्याकडेच या पक्षा चा कल राहिलेला आहे. त्यामुळे नेहरूंपासून अगदी आत्तापर्यंत आमच्या आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी, मनमोहन सिंगजी यांच्या पर्यंत सर्वांकडून होणाऱ्या भयंकर बदनामीला हा पक्ष सामोरा गेला आहे. आणि राहूल गांधींच्या बाबतीत तर या चाळीस पैसे वाल्या पेड ट्रोलर नी अक्षरशः धुमाकुळ घातला.

पण आमच्या दोन पंतप्रधानांची निर्घून हत्या होऊन देखील या पक्षाने आपला संयम कधीही तसूभर देखील ढळू दिला नाही. ही आमची कधीच कमजोरी नव्हती. तर कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचे? आणि सद्य घडीला काय महत्वाचे आहे? याची सीमा रेषा आम्हांला पक्की माहिती आहे. हवे तर ही आमची working style आहे असे म्हणा. असो

तुमचा सगळा बेधडक मामला. बजाव पूंगी हटाव लुंगी असो, अन्यथा क्रिकेट ग्राउंड उखाडणे असो. तुम्ही तुमच्या स्टाईल ने आत्तापर्यंत झोडपत आलात. पण जेंव्हा इंदिरांजी वर सगळे तुटून पडले. तेंव्हा त्यांचे जाहीर समर्थन करणारे तुम्हीच होतात. अगदी आत्ता आत्ता सुद्धा एनडीए मध्ये सहभागी असताना देखील आमची महाराष्ट्रा ची कन्या राष्ट्रपती होतेय. तर आम्ही कॉंग्रेस सोबत राहाणार अशी स्पष्ट भूमिका घेणारे तुम्हीच होतात. आणि म्हणूनच दिलदार विरोधक असल्याचा आम्हाला कॉंग्रेस जणांना नक्कीच आपल्या बद्दल आदर होता.

मधल्या काळात बरेच पुला खालून पाणी वाहून गेले. उद्धवजीं सारखा एक उत्तम संघटक जमिनीवर रहाणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चारित्र्य संपन्न असा नेता आपला पक्ष प्रमुख झाला आणि वर्षभरापूर्वी एक वेगळेच समीकरण आकारास आले. अर्थात त्या नंतर दोन्ही बाजू नी भलतीच खडखड झाली पण आदरणीय शरद पवार साहेब मध्ये आहेत. म्हटल्या नंतर दोन्हीकडून ग्रीन सिग्नल मिळाला.

मने जुळली सुर जुळले आणि मग हे गाडी ने घेतलेले अनपेक्षित वळण आणि वेग बघून समोरच्या गोटात प्रचंड पोटदूखी सुरू झाली. अक्षरशः आगीचा डोंब उसळला. चाळीस पैसे वाल्यांचा रेट वाढवून ऐंशी पैसे केला गेला. पण त्यांची ही मात्रा चालेना फसणविस घसा फोडून फोडून जाम झाले. त्यांच्या मदतीला मिसेस फसणविस आल्या.

खेळ खेळू ट्विटर चा हा एपिसोड रंगला. अचानक करोना ची एंट्री झाली. मग लढाई आणखी तीक्ष्ण झाली. तीनही पक्ष निकराने लढाई देत राहिले. नंतर सुशांत च्या मरण्याची देखील संधी घेऊन त्याचे सत्तेत परिवर्तन करण्याचे नाट्य रंगले. आदित्य या मोहऱ्या ला चेक देण्याचा प्रयत्न झाला. राहूल गांधी च्या बाबतीत स्ट्रॅटर्जी करणारी ऐंशी पैसे वाल्यांची टीम उत्साहाने कामाला लागली. साथीला अर्णब आणि टीम हालगी वाजवायला होतीच. इथं पर्यंत ही सगळे ठीक चालले होते. पण झाशा मारणारी राणी ची पूर्वनियोजीत पण अनपेक्षित दाखविली गेलेली एन्ट्री या रणांगणात झाली आणि आपण बेसावध होतात. राणी चे तोंड म्हणजे गटारच त्यात तीला "सांस भी कभी बहू थी" ची जागा घ्यायची तीव्र मनिषा. मग काय ती या "रणांगणात" चौफेर सुटली आणि आपण कारण नसताना या गोमयात हात घातले.

आपण सगळेच मुर्खांच्या नादाला लागू नका. ते त्यांच्या पातळी वर तुम्हाला नेतात आणि त्यांच्या (या मुर्खांच्या क्षेत्रातल्या दांडग्या) अनुभवाने तुमच्या वर विजय मिळवितात. या म्हणी च्या सत्यतेशी परिचीत आहोत. मग तुमच्या सारख्या एका हाडाच्या शिवसैनिका कडून, उद्धवजींच्या अत्यंत जवळ असणाऱ्या एका मित्रा कडून आणि शरद पवारांशी सख्य असणाऱ्या एका पत्रकाराकडून असे कसे घडू शकते? या बाबतीत तुम्ही पवार साहेबांचा आदर्श घ्यायला हवा. अगदी जहरीली टीका करणाऱ्या अण्णा हाजारेंच्या "एक ही मारा?" या अत्यंत बौद्धिक दिवाळखोरी च्या विधानावर "ही गांधी वादा ची वेगळी व्याख्या असावी" अशी संयत प्रतिक्रीया देणारे शरद पवार साहेब आठवा.

आणि ही लिहून दिलेले स्रिक्फ्ट वाचणारी, व्यसनांच्या आहारी जाऊन अनेकांच्या संसारात बिब्बा घालणारी स्वयंघोषित थोर समाज सेविका आणि बरंच काही. तर अशा हिच्या कडे पूर्ण दूर्लक्ष करा. कारण या महाराष्ट्रात हे वेगळे राजकीय समीकरण घडविण्यात तुमचे योगदान मोठे आहे. पुढे मोठी आव्हाने आहेत आणि ती आपल्याला पेलायची आहेत. या राज्याला परत प्रगतीपथावर न्यायचंय तेव्हा वाघा ची शिकार करायला बांधलेल्या या सापळ्यात चूकूनही आडकू नका. ही मनापासूनची विनंती.

अगदीच राहावले नाही म्हणून हक्का ने सांगीतले. चूक भूल देणे घेणे.

आपली स्नेहांकित

डॉ हेमलता पाटील

Updated : 12 Sep 2020 10:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top