Home > रिपोर्ट > प्रकृतीत सुधारणा : सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज

प्रकृतीत सुधारणा : सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज

प्रकृतीत सुधारणा : सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज
X

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 2 फेब्रुवारीला त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल केले होते. तीन दिवसाच्या उपचारादरम्यान त्यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. सोनिया गांधी यांच्या पोटात इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा ह्याही उपस्थित होत्या. तीन दिवसाच्या उपचारानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर सोनिया गांधींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.सोनिया गांधी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्यानं त्या मोठ्या कार्य़क्रमाला जाण्याचं टाळतात.

Updated : 5 Feb 2020 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top