Home > रिपोर्ट > अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा करू नका - प्रियांका गांधी

अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा करू नका - प्रियांका गांधी

अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा करू नका - प्रियांका गांधी
X

काँग्रेसचा नवीन अध्यक्ष प्रियांका गांधींना करा असा मानणारा मोठा वर्ग काँग्रेसमध्ये आहे. माञ प्रियांका गांधी यांनी मला या सगळ्यात ओडू नका असे वक्तव्य गुरुवारी झालेल्या काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केलं .राहुल गांधी अध्यक्ष पद सोडल्यानंतर काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे.जेव्हा राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस त्या बैठकीत प्रियांका गांधी चे नाव पुढे आले होते.त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष हा गांधी-नेहरू घराण्याच्या बाहेरील शोधावा असे सूचना राहुल गांधींनी कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्या होत्या. पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग व खासदार शशी थरूर यांनीही प्रियांका गांधी यांचे नाव पुढे केले होते. शशी थरुर यांनी तरुण नेतृत्व काँग्रेस पक्षाला तारू शकेल असं वक्तव्य करून प्रियांका गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले होते.

Updated : 2 Aug 2019 6:32 AM GMT
Next Story
Share it
Top