Home > रिपोर्ट > काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांचा बच्चेकंपनी सोबत डान्स

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांचा बच्चेकंपनी सोबत डान्स

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांचा बच्चेकंपनी सोबत डान्स
X

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी एका कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांन सोबत सामूहिक डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

एकीकडे अभूतपूर्व जोश, चेहऱ्यावर ओसंडून वाहणारे हास्य आणि मनात काही तरी करून दाखवण्याची उर्मी, तर दुसरीकडे भावनिक आवेग, असे चित्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथे २६ जुलै रोजी यशोमती ठाकूर मित्र मंडळ, शिक्षण विभाग व नगर पंचायत यांच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या मस्ती की पाठशाला पाहायला मिळाले. या वेळी २ हजाराच्यावर विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी कार्यक्रम संपल्यानंतर शालेय मुलीनं सोबत सामूहिक डान्स करत आनंद व्यक्त केला

लोकप्रतिनिधी नेहमी धकाधकीच्या काळात राहतात मात्र काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी मनसोक्त आनंद घेत भर कार्यक्रमात विद्यार्थीनी सोबत पब्लिक मध्ये जाऊन डान्स केला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://youtu.be/FvfUOSc-rC0

Updated : 30 July 2019 10:44 AM GMT
Next Story
Share it
Top