Home > रिपोर्ट > मिसेस सीएम यांना काँग्रेसच्या हेमलता पाटील यांचा पाठिंबा

मिसेस सीएम यांना काँग्रेसच्या हेमलता पाटील यांचा पाठिंबा

मिसेस सीएम यांना काँग्रेसच्या हेमलता पाटील यांचा पाठिंबा
X

( अमेरिकेत एका चॅरिटी म्युझिक शो मध्ये अमृता फडणवीस यांनी गाणी गायली. या शो मधले काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले असता. त्यांना भलतचं ट्रोल करण्यात आलं. यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी ट्रोलधाड्यांना चांगलचं उत्तर देत काँग्रेसचेही कान टोचले आहे. वाचा काय म्हटलंय हेमलता पाटील)

अमृता वाहिणींचा हा फोटो सोशल मीडियावर भलताच ट्रोल झाला. मला खरे तर या दुतोंडी समाज मानसिकतेची मनस्वी चिड आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत या पेक्षा ही त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत, त्यांना स्वतःच्या आवडी-निवडी प्रमाणे जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे हे जास्त महत्वाचे आहे. त्यांनी कोणते कपडे घातले पाहिजेत? काय केले पाहिजे हे सांगणारे आम्ही कोण? एकीकडे पुरोगामी पणाच्या बाता मारायच्या दुसरीकडे बूरसटले पणाला घट्ट चिकटून रहायचं ही दुटप्पी भूमिका आम्ही बंद केली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर माझे शेकडो आक्षेप असतील आणि मी ते प्रत्येक वेळी निर्भयपणे मांडलेले आहेत पण म्हणून त्यांची पत्नी जी पूर्णतः वेगळ्या क्षेत्रात काम करतेय तिला फुकटची नैतिकतः शिकविण्याचा अधिकार मला कोणी दिला? हो मध्ये एका कार्यक्रमात अमृता वहिणींनी लिहून आणलेलं भाषण वाचताना महिलांनी मेकअप आणि फॅशनच्या मागे लागू नका असा अनाहूत सल्ला बायकांना दिला होता तेव्हा मी त्यांची भरपूर खिल्ली उडविली होती, असा अपवाद एखादाच पण या सगळ्यात त्या स्वतः च वेगळे अस्तित्व जपतात हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचे. त्या अर्थाने मुख्यमंत्री मला खरे पुरोगामी वाटतात एकीकडे स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे तिला एका चौकटीत अडकवायचे हा ढोंगी पणा त्यांच्या कडे तरी नाही. शेवटी नात्यांमधली स्पेस महत्वाची. मला मना पासून वाटले ते लिहिले कृपया प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणे थांबवा. माझ्या काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असे करणार नाही कारण आपण नेहमीच महिलांना सन्मान देण्याच्या भूमिकेत आहोत. आणि सनातन,बजरंगदल वाल्यां ना सहन होत नसेल तर गोमय थापून गोमूत्रा ने अंघोळ करा ...

हेमलता पाटील, प्रवक्त्या, काँग्रेस

Updated : 8 Jun 2019 5:19 AM GMT
Next Story
Share it
Top