जिल्हाधिकाऱ्यांच्या कन्येचं शिक्षण सरकारी अंगणवाडीत ....
Max Woman | 4 Jun 2019 10:05 AM GMT
X
X
इंग्रजी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. आणि ते मिळवण्यासाठी पालक अतोनात प्रयत्न करत असतात. मात्र मध्यप्रदेशचे आयएएस अधिकारी डॉ. पंकज जैन यांनी समाजासमोर एक नवा अादर्श उभा केला आहे. त्यांनी आपल्या मुलीला कुठल्याही मोठ्या शाळेत न टाकता चक्क सरकारी शाळेच्या अंगणवाडीत शिक्षणसाठी प्रवेश घेतला आहे.
आपण नेहमी पाहत आलो आहे की मोठ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलं मोठ-मोठ्या सीबीएसई, आयसीएसईच्या शाळांमध्येच प्रवेश घेतात. आणि त्यांना तो सहज मिळतो ही… मात्र डॉ. जैन यांनी आपल्या मुलीचा सरकारी शाळेत प्रवेश घेऊन समाजाला संदेश दिला आहे की, शिक्षण सरकारी शाळेत असो किंवा खाजगी शाळेत… आपल्या पाल्यांनी शिक्षण घेणं महत्त्वाचं..
Updated : 4 Jun 2019 10:05 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire