Home > रिपोर्ट > महिलांनो, महाराष्ट्र सरकार तुमचा भाऊ म्हणून धावून येईल- उद्धव ठाकरे

महिलांनो, महाराष्ट्र सरकार तुमचा भाऊ म्हणून धावून येईल- उद्धव ठाकरे

महिलांनो, महाराष्ट्र सरकार तुमचा भाऊ म्हणून धावून येईल- उद्धव ठाकरे
X

राज्यात कोणत्याही महिलेला कोठेही आपल्यावर अन्याय होत असल्याची जाणीव झाल्यास पोलिसांना फोन करावा. सरकार तुमचा भाऊ म्हणून पाठीशी ऊभं राहिलं अशी शाश्वती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओद्वारे जनतेशी संवाद साधताना दिली आहे.

“कोरोनाच्या संकटकाळात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. पण महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. महाराष्ट्रात अशी एकही घटना अजिबात होता कामा नये. तरीही महिलांना दुर्दैवाने कुठे असा अनुभव आल्यास रक्षणासाठी आपण १०० नंबर देत आहोत. महिलांनी अन्याय होत असल्यास तात्काळ या नंबरवर फोन करावा. आपलं महाराष्ट्र सरकार आपला भाऊ म्हणून पाठीशी उभं राहीलं.” असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महिलांना दिलं आहे.

घरोघरी Anti Corona Police दिसत आहेत, विश्वास नांगरे पाटील यांच्या मुलांनीच त्यांना आधी हात, मोबाईल स्वच्छ धुण्यास सांगितलं, याचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे.

ज्या बालगोपाळांनी आपल्या वाढदिवसाचे किंवा खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले, त्यांचे कौतुक, मात्र सरकार खंबीर आहे, चिमुरड्यांनी आपले पैसे स्वतःजवळच ठेवावे

येत्या 20 तारखेपासून ग्रीन झोनमधील, ऑरेंज झोनमधील काही व्यवसाय सुरु होत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिली. मात्र, राज्यातील वृत्तपत्रछपाईवर घातलेली बंदी कायम राहील. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

लतादीदींच्या गाण्याची आठवण झाली, सरणार कधी रण… शत्रू दिसत असता, तर हिंदुस्थानी जनतेने एक घाव घालून दोन तुकडे केले असते, मात्र, हा अदृश्य शत्रू आपल्याच माणसाच्या माध्यमातून वार करतो.

महाराष्ट्रात कोरोना सुरु होऊन सहा आठवडे होत आले, काल संध्याकाळपर्यंत ६६ हजार ७९६ टेस्ट केल्या, किमान ९५ टक्के निगेटिव्ह, ३६०० जणांना लागण, ३५० जण बरे, ७० ते ७५ टक्के अतिसौम्य किंवा लक्षण नसलेले.

सर्दी खोकला ताप असे कोणतेही लक्षण लपवू नका, कोणी आपल्याला वाळीत टाकण्याची भीती बाळगू नका, घरी उपचार करु नका, फीव्हर क्लिनिकला भेट द्या, कोरोना झाला म्हणजे सगळे संपलं नाही, वेळेत आलेले चिमुकले ते वृद्ध बरे होतात.

नॉन-कोविड रुग्णांच्या म्हणजे किडनी किंवा इतर विकार असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी दवाखाने खुले ठेवा

८० ते ९० टक्के जनतेपर्यंत रेशन पोहोचले, केंद्राची मदत होत आहे, केंद्र मोफत धान्य देत आहे, पण फक्त तांदूळ आला आहे, तोही अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत येणाऱ्या जनतेसाठी, डाळ आणि गव्हाची मागणी केली आहे.

महाराष्ट्र आणि मुंबई यातील आकड्यात काहीशी घट, पण इतक्यात भ्रमात राहायचं नाही, आकडे वरखाली होत राहतात, मी तपास करण्यास सांगितला आहे.

अर्थचक्र रुतलं आहे, कोरोनाच्या संकटातून बाहेर येताना आर्थिक संकट नको, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील काही उद्योगधंद्यांना परवानगी देणार, त्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला अजूनही परवानगी नाही, जिल्ह्यातच मालाची ये-जा करण्यास माफक परवानगी, आपण घरातच बसायचं आहे, अद्याप वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवण्यास संमती नाही.

Updated : 19 April 2020 9:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top