"ठाकरे" सरकारमधील या तीन "महिला मंत्र्यांना" मिळाले हे खाते...
Max Woman | 5 Jan 2020 4:19 AM GMT
X
X
मंत्रीमंडळ विस्तार झालं मात्र काही दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे खातेवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता राजभवनवर देण्यात आली. राज्यपालांनी या यादीवर शिक्कामोर्तब केल्यानांतर खातेवाटप जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे सरकारमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना महिला व बालविकास हेखातं देण्यात आलं आहे. तर वर्षा गायकवाड यांना शालेय शिक्षण खातं देण्यात आले आहे. त्याचबरोबर नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती सुनिल तटकरे यांना उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क हे खातं मिळालं आहे.
Updated : 5 Jan 2020 4:19 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire