Home > रिपोर्ट > तत्वनिष्ठता ठरली फोल, चित्रा वाघ पुन्हा ट्रोल

तत्वनिष्ठता ठरली फोल, चित्रा वाघ पुन्हा ट्रोल

तत्वनिष्ठता ठरली फोल, चित्रा वाघ पुन्हा ट्रोल
X

राज्यपालांचे निमंत्रण भाजपने(BJP) नाकारत सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh ) यांनी भाजपच्या भूमिकेचं स्वागत करत ट्विट केलं होतं. सत्तेपेक्षा तत्व महत्त्वाचे असतात असं म्हणत भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा घेतलेला निर्णय अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं.

त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून चित्रा वाघ यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली तो पक्ष सोडताना काहींना तत्व आठवली नाही आणि आता आठवायला लागली आहेत असा चाकणकर यांनी वाघ यांना टोला लगावला. फेसबुक आणि ट्विटरवही राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून चित्रा वाघ यांना ट्रोल करण्यात येतंय.

Updated : 11 Nov 2019 11:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top