Home > पर्सनॅलिटी > राजकारणात कशा आल्या चित्रा वाघ?

राजकारणात कशा आल्या चित्रा वाघ?

राजकारणात कशा आल्या चित्रा वाघ?
X

महिलांनी राजकारणात येणं तेही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जरा कठीणच आहे. मात्र अशक्य नाही... एक साधारण व्यक्ती म्हणून चित्रा वाघ यांनी आपला प्रवास सुरु केला.. राजकारणात आल्यानंतर टप्प्या-टप्प्यानं त्यांनी पद भूषवत आपली ओळख निर्माण केली. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. चित्रा वाघ यांनी राजकारणात आल्यापासून स्वतःचे 40 किलो वजन देखील कमी केलं आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सतत तत्परतेनं आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांनी समाजातील अनेक प्रश्नांवर कामं केली आहेत आणि करत आहेत, मग ते राजकारण असो किंवा समाजकारण असो... त्यांनी राजकारणात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बुद्धिमत्तेच्या आधारावर राजकारणात आलेल्या चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास तसेच पुढील महत्त्वकांक्षा काय असणारेय जाणून घेण्यासाठी पाहा ही मुलाखत.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/821878058175751/

Updated : 15 May 2019 12:46 PM GMT
Next Story
Share it
Top