Home > रिपोर्ट > भाजपनं सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय अभिमानास्पद - चित्रा वाघ

भाजपनं सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय अभिमानास्पद - चित्रा वाघ

भाजपनं सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय अभिमानास्पद - चित्रा वाघ
X

राज्यपालांचे निमंत्रण भाजपने नाकारत सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर भाजप नेत्यांकडून पक्षाच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं. भाजपच्या भूमिकेवर चित्रा वाघ यांनी ट्विट केलय. सत्तेपेक्षा तत्व महत्त्वाचे असतात असं म्हणतभाजपने सत्ता स्थापन न करण्याचा घेतलेला निर्णय अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय.

निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये मेगा भरती झाली होती. अनेकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडत भाजमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा देखील समावेश होता.

भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणून मी भाजपमध्ये आले. लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्यांच्या समस्या सोडवून दाखवेन. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडला असल्याचं चित्र वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करतांना म्हटलं होतं.

Updated : 11 Nov 2019 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top