चंद्रयान-2 : इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं सोनिया गांधी यांनी केलं कौतुक, म्हणाल्या
X
शुक्रवारी रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताने चंद्रयान-2 या मोहिमे अंतर्गत चंद्रयान उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार तेवढ्यात लँडर विक्रमचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्याआधी हे यान चंद्रापासून केवळ 2.1 किमी अंतरावर होतं. त्यानंतर संपुर्ण देशासह जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील नेत्यांनी आपण इस्त्रोंच्या शास्त्रज्ञांसोबत असल्याचं सांगत शास्त्रज्ञांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेस आणि युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील शास्त्रज्ञांना दिलासा देण्यासाठी एक ट्विटरवर पोस्ट केली आहे.
यामध्ये त्यांनी ‘हा प्रवास भले मोठा झाला असला तरी येणाऱ्या भविष्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. मी इस्रो आणि त्यासंबधित जोडलेल्या पुरूषांची तसेच स्त्रियांची ऋणी आहे. कारण त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाने भारताला आवकाशातील जगामध्ये अग्रगण्य देशांच्या ओळीत नेऊन उभे केले आहे. आणि भविष्य़ातील पिढींना त्यापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा इस्त्रोने दिली आहे.’ असं म्हणत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा सोनिया गांधी गौरव केला आहे.