Home > News > कोरोनाबाधित महिलांच्या यशस्वी प्रसूतीची सेंच्युरी

कोरोनाबाधित महिलांच्या यशस्वी प्रसूतीची सेंच्युरी

कोरोनाबाधित महिलांच्या यशस्वी प्रसूतीची सेंच्युरी
X

कोरोनाबाधित गरोदर मातांना आपल्या बाळाला ही हा आजार होणार नाही नं? याची भिती असते. ही काळजी योग्यच आहे. पण सोलापुरच्या सिव्हील हॉस्पीटलचं उदाहरण पाहून मात्र ही भिती थोडी दूर होईल एवढ नक्की.

तर झालंय असं की, सोलापुरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून आजपर्यंत 2503 मातांनी बालकांना जन्म दिला. त्या पैकी 107 माता या कोरोनाग्रस्त होत्या. यातील 100 कोरोना बाधित माता आजपर्यंत कोरोना मुक्त होऊन सुखरूपपणे घरी गेल्या आहेत. यापैकी आठ मातांची नवजात बालके कोरोना बाधित होती. तीसुद्धा कोरना मुक्त होऊन घरी गेली आहेत. या 100 पैकी 61 मातांचे सिझेरिअन करावे लागले तर एकूण 39 मातांची प्रस्तुती नॉर्मल झाली आहे. यातली शंभरावी माता शनिवारी कोरना मुक्त झाली.

काय वाचून वाटलं न भारी... या मागची मेहत आहे रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शुभलक्ष्मी जयस्वाल व त्यांच्या सहकाऱ्यांची. विशेष म्हणजे या रुग्णालयातून जेव्हा 100 व्या कोरोना बाधीत मातेला घरी सोडण्यात आले तेव्हा या मातेची पाठवणी नी फुलांचा वर्षाव करून साडीचोळी देऊन थाटात करण्यात आली. काय मग झालात नं थोड्या टेन्शन फ्री?

Updated : 8 Sep 2020 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top