मुलीसाठी स्मृती ईराणींनी डिलीट केली 'ती' पोस्ट
Max Woman | 23 Jun 2019 12:27 PM IST
X
X
संसदेत आग्रहीपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जेव्हा रागाने लालबुंद होतात तेव्हा.. हो, या रागालाही कारण तसंच आहे. त्यांच्या मुलीला शाळेत वर्ग मित्रांनी लूकवरू चिडवले. हे कळल्यावर स्मृती इराणी यांचा पारा चढला. काय करू नी काय नाही. अशी अवस्था झालेल्या इराणी यांनी मग 'इंस्टाग्रामवर' आपल्या मुलीला अपमानित करणाऱ्यांवर राग काढला. ते ही अत्यंत तिखट भाषेत प्रतिक्रिया देऊन.
या पोस्टमध्ये इराणी म्हणतात...
'मी काल माझ्या मुलीसोबत टाकलेला एक सेल्फी डिलीट केला आहे. कारण एक ए झा नावाचा मूर्ख वर्गामध्ये माझ्या मुलीच्या लूकवरुन तिला चिडवत होता. सोबतच तो त्याच्या मित्रांनाही सांगत होता की, तिच्या आईच्या इंस्टाग्राम पोस्टवर जाऊन लूकवरून तिला अपमानित करा'.
महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, माझ्या मुलीने मला पोस्ट डिलीट करायला सांगितल्यामुळे मी डिलीट केली. मी तिचं ऐकलं कारण मी तिच्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत नाही. पोस्ट डिलीट करण्याच्या निर्णयामुळे चुकीच्या माणसाला आणखी बळ मिळते, असेही त्यांनी म्हटलं आहे. आपल्या मुलीच्या यशाच्या गोष्टी सांगत ती स्वतः अशा गोष्टींचा सामना करेल, असेही स्मृती इराणी म्हणतात.
इराणींनी म्हटलं आहे की, माझी मुलगी एक चांगली खेळाडू आहे. लिम्का बुकमध्ये तिचं रेकॉर्ड नोंदलं गेलेलं आहे. कराटेचा ब्लॅक बेल्ट आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळेला कास्यपदक मिळाले आहे. ती खूप प्रेमळ आणि खूप सुंदर आहे, असे स्मृती इराणींनी म्हटलं आहे. तुम्ही कितीही त्रास द्या, ती सक्षमपणे सामना करेल, ती जोश इराणी आहे आणि मला तिची आई असल्याचा अभिमान आहे, असेही स्मृती इराणी आपल्या पोस्टमध्ये सांगायला विसरत नाही.
Updated : 23 Jun 2019 12:27 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire