Home > रिपोर्ट > सरकारने शेवटचं रत्न विकायला काढलं – सुप्रिया सुळे

सरकारने शेवटचं रत्न विकायला काढलं – सुप्रिया सुळे

सरकारने शेवटचं रत्न विकायला काढलं – सुप्रिया सुळे
X

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत वर्षातील सर्वात मोठे भाष्य संसदेत होत असताना शेअर बाजार 700 अंकानी कोसळला. असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या अर्थसंकल्पात काहीच अर्थ नसल्याची टीका केली आहे.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना शेअरबाजार तब्बल ७०० अंकांनी कोसळला यावरुनच सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सरकारने शेवटचं रत्न विकायला काढलं...

सरकारच्या हातात शिल्लक राहिलेलं शेवटचं रत्न अर्थात एलआयसी (LIC) विकून त्यातून काही निधी उभारण्याचा घाट या सरकारने घातलाय. अर्थव्यवस्थेची दुर्दशा लपविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.पण एलआयसीनंतर सरकारकडे विकण्यासारखं काहीही उरणार नाही.त्यानंतर हे सरकार काय करणार ? असा सवाल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारला केला आहे.

Updated : 1 Feb 2020 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top