Home > रिपोर्ट > Budget 2020 LIVE : निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना, महिलांसाठी काय?

Budget 2020 LIVE : निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना, महिलांसाठी काय?

Budget 2020 LIVE : निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना, महिलांसाठी काय?
X

अर्थमंत्री निर्मला सितारमण आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांची कॅबिनेटची बैठक पार पडली. आर्थिक मंदी दरम्यान हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने महत्वाचा मानला जात आहे.

त्यातच एक महिला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असल्यानं महिलांच्या निर्मला सितारमण यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत..या अर्थसंकल्पाची तीन वैशिष्ट्यं असल्य़ाचं अर्थ मंत्र्यांनी सांगितलं.

Aspirational India

economic devlopment आणि

caring society

ही वैशिष्ट्ये अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सांगितली.

सर्व मंत्रालयांकडून आपल्या खात्यासाठी क्वालिटी स्टॅंडर्डचे निर्देश देण्यात येतील.

नवीन अर्थव्यवस्था नवे शोध, तंत्रज्ञान यांच्यावर अवलंबून असेल.

जीएसटी चे मुख्य आर्किटेक्ट सध्या आपल्यात नाहीयेत.. जीएसटीने अर्थव्यवस्थेचे पाया मजबूत केला आहे असं म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना अरुण जेटली यांची आठवण काढली.

अर्थसंकल्पाच्या भाषणात निर्मला सीतारामन यांनी काश्मिरी भाषेत केली कविता सादर

'मेरा वतन शालीमार बाग जैसा, मेरा वतन दल लेक में खिलते कमल जैसा, नव जवानो के खून जैसा, मेरा वतन तेरा वतन... हमारा वतन दुनिया का सबसे प्यारा वतन...'

आम्ही 60 लाख नव करदाते जोडले. देशातील बँकांची स्थिती सुधारली.

भारत हा जगातील 5 वी मोठी अर्थव्यवस्था आहे.

2022 ला जी-20 परिषद भारतामध्ये होणार, त्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात - सीतारामन

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपनुसार वेअरहाऊस बांधण्यात येतील.

कोलकात्याच्या सर्वात जुन्या संग्रहालयाचं पुनरुज्जीवन करणार, - 4 संग्रहालयांचे नुतनीकरण करणार

महिला

महिलांच्या प्रगतीसाठी योजनांमध्ये 28 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद

पोषण आहार योजनेसाठी 35 हजार 600 कोटींची तरतूद

6 लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले

आंगणवाडी योजनेंतर्गत 10 लाख नागरिकांना लाभ झाल्याची माहिती

महिलांच्या स्वयंसेवी संस्थांना प्राधान्याने मदत करण्यात येईल.

महिला स्वंयसहायता गटांना केंद्रस्थानी ठेऊन योजना तयार करण्यात येतील

बेटी बचाव बेटी पढाव या योजनेला चांगलं यश आलं असल्याचा अर्थमंत्र्यांच्या भाषणात उल्लेख - बेटी बचाओ, बेटी पढाओचा फायदा झाला

चांगले संकेत : मुलांच्या तुलनेत मुलींची शाळांमधली संख्या मोठ्या प्रमाणात वाढली

10 कोटी कुटुंबाला पोषण मूल्यांची माहिती देणार

कर/टॅक्स

वार्षिक पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त अर्थमंत्र्यांची घोषणा

10 ते 12.50 लाखसाठी आता 20 टक्के कर मर्यादा

5 लाख ते 7.50 लाख उत्पन्नासाठी आता 10 टक्के करमर्यादा अगोदर 20 टक्के कर मर्यादा होती.

7.50 लाख ते 10 लाख साठी आता 15 टक्के कर मर्यादा, आधी 20 टक्के कर मर्यादा होती.

वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा असणाऱ्यांवर 30 टक्के कर कायम

नवीन कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 15 टक्के असणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

नागरिकांचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी शेड्यूल्ड कमर्शियल बँकांवर सरकारची नजर असेल. बँकेतील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींवर आता सुरक्षा मिळणार आहे. या अगोदर ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत होती.

भारतात गेल्या 2 वर्षांत 60 लाख नवीन करदाते तयार झाले, देशातील इन्स्पेक्टर राज संपवण्यात यश, बँकिंग व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे तसेच देशातल्या बँकांची स्थिती सुधारली. कायद्यांतर्गत टॅक्स चार्टर आणलं जाईल. टॅक्समुळे कुणालाही त्रास होणार नाही.

IDBI बँकेतला उर्वरित सरकारी हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विकणार

एलआयसीमधला मोठा हिस्सा विकणार...

जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख या नव्या केंद्रशासित प्रदेशासाठी 3 हजार 757 कोटींची तरतूद, लडाखसाठी 5,900 कोटी रुपये

शेती

2.83 लाख कोटी रुपयांची शेती आणि शेतीविषयक कामांसाठी तरतूद

6.11 कोटी शेतकऱ्यांपर्यंत सरकार विविध योजनांच्या माध्यमातून पोहोचलं.

2025 पर्यंत दुध उत्पादन दुप्पट करणार

शेतकऱ्यांसाठी लवकरच विविध पेन्शन योजना राबवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार

रसायनयुक्त खतांचा वापर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, रसायनमुक्त शेतीवर सरकारचा भर

सरकार सेंद्रीय शेतीला प्राधान्य देणार

भारतीय रेल्वे 'किसान रेल्वे' सुरू करणार आहे. शेतीच्या मालाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही रेल्वे उपयोगी ठरणार आहे.

20 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार..

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची कुसुम योजना.

जिल्हास्तरावर फळ उत्पादनाला महत्व दिलं जाणार

विविध संस्थांच्या मदतीने 15 लाख कोटी रुपयांचा निधी कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध करण्यात येईल.

2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार... शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट जाण्यासाठी शेतकऱ्यांना जोडव्यवसाय करण्यास प्रोत्साहित केलं जाईल.

पीएम किसान योजनेअंतर्गत 16 कलमी कार्यक्रम राबवला जाणार

2020 पर्यंत जनावरांसाठी 108 मिलियन टन पर्यंत चारा उपलब्ध होईल

100 दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यांसाठी खास कार्यक्रम राबवला जाणार

आरोग्य

69 हजार कोटी रुपये आरोग्यविषयक योजनांमध्ये वापरले जाणार...

हेल्थ मिशनला स्वच्छ भारत योजनेमुळे फायदा झाला.

छोट्या शहरांत आयुष्मान हॉस्पिटल बनवण्यात येतील

कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा आरोग्य क्षेत्रात वापर केला जाणार : आयुष्मान भारत योजना राबवताना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल

चांगले डॉक्टर निर्माण होण्यासाठी नवीन आरोग्य विद्यापीठ तयार केले जातील

टीबी विरोधात मोहिम : टीबी रोगाविरोधात आवश्यक ते प्रयत्न केले जाणार, टीबी हारेगा भारत जितेगा असं म्हणत टीबी विरोधात मोहिम आखली जाणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती.

जिल्हा रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांना सलग्न केलं जाणार, वैद्यकीय क्षेत्रात असलेली डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार.

शिक्षण

शिक्षण क्षेत्रासाठी 99,300 कोटींची तरतुद

सरकारची मोठी घोषणा : कौशल्य विकासासाठी 3 हजार कोटी (ही रक्कम 99,300 कोटी मध्ये नसणार)

राष्ट्रीय रोजगार संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या खात्यांसाठी एकच परिक्षा

मोठी घोषणा : आघाडीच्या १०० मध्ये असणाऱ्या शिक्षण संस्थांकडून डिजीटल शिक्षण उपलब्ध करणार

मोबाईल उत्पादन वाढीसाठी विशेष तरतूद

राष्ट्रीय बँकांतील भरतीसाठी राष्ट्रीय भरती एजंसी उभारली जाणार

सरकार नवीन शैक्षणिक धोरण आणणार...

PPP मॉडेलवर मेडिकल कॉलेज उभारले जातील.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरूण इंजिनियरांना इंटर्नशीप देण्यात येणार अर्थमंत्र्यांची घोषणा

बाहेरचे विद्यार्थी आपल्या देशात येऊन शिक्षण घ्यावेत यासाठी सरकार प्रयत्न करणार

चांगले डॉक्टर निर्माण होण्यासाठी नवीन आरोग्य विद्यापीठ तयार केले जातील

सरकार ऑनलाइन पदवी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणार, वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सोय केली जाणार अर्थमंत्र्यांची घोषणा.

जिल्हा रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांना सलग्न केलं जाणार, वैद्यकीय क्षेत्रात असलेली डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार.

परकीय भाषा शिकवण्यावर विशेष भर दिला जाणार, देशातील विद्यार्थी बाहेरच्या देशात जाऊन देखील काम करु शकतील

मार्च 2025 पर्यंत डिप्लोमासाठी 150 संस्था सुरु करणार

नॅशनल फॉरेन्सिक विद्यापीठ सुरु करणार

व्यापार

व्यापार क्षेत्रासाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 4 वर्षांत 1480 कोटी दिले

निर्यात होणाऱ्या वस्तूंवरचा कर कमी करण्यात येईल

विविध उत्पादन ई-कॉमर्स क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देणार

कंपनी कायद्यामध्ये काही दुरुस्त्या करू

पायाभूत सुविधा

100 लाख कोटी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणार .

शहर : 5 नवीन स्मार्ट सिटी तयार केल्या जातील.

उद्योग आणि व्यापार विस्तारासाठी 27,300 कोटींची सरकारची तरतूद

इन्फ्रा पाईपलाईनच्या माध्यमातून 6500 प्रोजेक्टस करणार

वीज वापराचे स्मार्ट मीटर बसवले जातील.

रस्ते

2023पर्यंत मुंबई - दिल्ली एक्सप्रेस मार्ग पूर्ण करणार

चेन्नई-बंगळूर, दिल्ली-मुंबई दरम्यान एक्स्प्रेस हायवे सुरु करणार

2024 पर्यंत 6 लाख किमीचे रस्ते बनविणार

रेल्वे

27,000 किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यात येणार

रेल्वे विभागाच्या उपलब्ध जमिनीवर (मोकळी), रेल्वेमार्गाच्या बाजूने सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार

तेजस ट्रेनसारख्या रेल्वे गाड्या सुरू केल्या जातील.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांचा उल्लेख, बुलेट ट्रेनच्या मार्गाला चालना देणार

550 रेल्वे स्टेशनवर मोफत वाय फाय सुविधा उभारली जाणार

चांगल्या सुविधा देण्यासाठी आता रेल्वेमध्ये खासगी सहभाग वाढणार

जलमार्ग

2020 मध्ये जलविकास मार्ग फेज 1 पूर्ण होईल

सागरी किनारी दोन हजार किमीचे रस्ते उभारणार

चांगल्या सुविधा देण्यासाठी आता रेल्वेमध्ये खासगी सहभाग वाढणार

हवाईमार्ग

2024 पर्यंत 100 नवीन विमानतळ उभारले जातील

देशातंर्गत विमान प्रवासात वाढ व्हावी याकरिता उडान योजनेवर भर

तंत्रज्ञान...

भारत नेट प्रोग्रामला 6 हजार कोटींची तरतूद

डेटा सेंटर पार्कसाठी नवं धोरण बनवण्यात येईल

इन्फ्रा पाईपलाईनच्या माध्यमातून 6500 प्रोजेक्टस करणार

क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी 8 हजार कोटींची तरतूद

ग्रामपंचायत स्तरापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हीटी तयार होण्यासाठी डेटा सेंटरचा वापर करता येणार

पर्यावरण

जास्त प्रदुषण करणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पांना बंद करण्यासाठी पाऊल उचलले जातील.

स्वच्छ हवेसाठी 4 हजार 400 कोटींची तरतूद

मत्सव्यवसाय...

मासळी उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबवणार, ​'सागर मित्र' योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसायात समुद्र किनारी राहणाऱ्या तरूणा वर्गाला रोजगार निर्माण केला जाणार

पर्यटन

राखीगढी

हस्तिनापूर

शिवसागर

धोलाविरा

आदिचन्नेलू

या पाच पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे.

सामाजिक न्याय

अर्थमंत्र्य़ांची अनुसुचित जाती व जमातीसाठी 85 हजार कोटींची तरतूद

अनुसुचित जमातीसाठी 53,700 कोटी रुपयांची तरतूद

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी 9 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद

झारखंडच्या रांचीमध्ये आदीवासी संग्रहालय बांधण्यात येईल. अर्थमंत्र्यांची घोषणा

सांस्कृतीक

सांस्कृतिक मंत्रालयासाठी 3 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद

  • .

Updated : 1 Feb 2020 5:49 AM GMT
Next Story
Share it
Top