हे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही: मायावती
Max Woman | 17 May 2019 4:10 AM GMT
X
X
पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चुकीचं ठरवलं जाते , हा त्यांचा राजकीय कट आहे, ही प्रवृत्ती देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही,' अशी टीका मायावती यांनी केली आहे. त्याचबरोबर सध्या बंगालमधील राजकारण देशात चर्चेचा विषय बनला आहे.
याला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक जबाबदार आहेत असंही मायावती म्हटल्या. हाच राजकीय कट सत्ताधारी भाजप उत्तर प्रदेशमध्ये करत आहे मात्र आमच्या महाआघाडीने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला,' सरकारला आलेले अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्ष अशाप्रकारची राजकीय खेळी करत आहे असेही त्या पुढे म्हणाल्या.
Updated : 17 May 2019 4:10 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire