Coronavirus : बॉलीवुडचा किंग खान म्हणतोय करोनामुळे शक्य झाल्या या गोष्टी
X
करोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. या भयंकर परिस्थितीमध्ये सगळ्यांना आप-आपल्या घरात बसावं लागतंय. पण तुम्हाला माहित आहे का बॉलीवुडचा किंग खान या वेळेचा सदुपयोग कसा करतोय. यासंदर्भात मॅक्सवुमनशी बोलताना शाहरुख खान ने सांगितलं की, माझा दररोजचा वेळ सकाळी उशिरा सुरु होतो कारण मी रात्री लेट म्हणजे पहाटे चार कधी तीनला झोपत असतो.
त्यामुळे करोना मुळे ह्या मिळालेल्या वेळेचा अधिकाधिक उपयोग मी स्क्रिप्ट वाचण्यासाठी करतोय. माझ्याकडे किमान २०-२२ पटकथा तयार आहेत. ज्या वाचून त्या फिल्म्स करायच्या किंवा नाहीत हा निर्णय मी गेली २ वर्षे घेऊ शकलो नव्हतो जो आता घेईन. गौरीसोबत मी बॅडमिंटन खेळतोय .
अबराम (मुलगा वय वर्षे ६ ) सोबत पतंग उडवण्यापासून कॅरम खेळण्यापर्यंत आम्ही छान एन्जॉय करतोय. माझ्या स्वतःच्या २ फिल्सचे शूटिंग सुरु व्हायचे होते. अंतराळवीर राकेश शर्माच्या बायोपिकचे काम सुरु करायचे होते. पण सध्या शूटिंगच्या तारखा निश्चित व्हायच्या आहेत . ग्लोबल समस्या जेंव्हा आपल्या आरोग्याशी निगडित असतात तेंव्हा आपण हतबल असतो !