Home > रिपोर्ट > उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे धनुष्य हाती घेणार का?

उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे धनुष्य हाती घेणार का?

उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे धनुष्य हाती घेणार का?
X

काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या रंगात आली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना उर्मिला मातोंडकर आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे. “ मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमानी अफवांकडे दुर्लक्ष करावे” असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मागच्या आठवड्यात काँग्रेसचा पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या आता शिवसेनेत जाणार अशी सकाळपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यामुळे मातोंडकर शिवसेनेचे शिवबंधन बांधणार अशी चर्चा रंगू लागली आहे. या साऱ्या अफवा आहेत. असं सांगून यावर त्यांनी पडदा टाकला आहे. परंतू उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 17 Sep 2019 11:05 AM GMT
Next Story
Share it
Top