Home > रिपोर्ट > अंधत्वावर मात करत धनश्रीनं मिळवले ९२ टक्के 

अंधत्वावर मात करत धनश्रीनं मिळवले ९२ टक्के 

अंधत्वावर मात करत धनश्रीनं मिळवले ९२ टक्के 
X

आज बारावीचा निकाल लागला. अकोला जिल्ह्य़ातील अकोट येथील हागे कुटुंबात आनंदाचीच नाही धन्यतेचीही वृष्टी झाली. धनश्री हागे ही तब्बल 92% गुण घेऊन गुणवत्ता यादीत झळकली. तिच्या यशाचं विशेष कौतुक यासाठी की हे यश तिने अंधत्वावर मात करत मिळवले आहे. तिच्या यशात तिच्या आईचा फार मोठा वाटा आहे.

12 वी च्या अभ्यासक्रमाचे ध्वनिमुद्रण क्षितिज अकोला ने धनश्रीला दिले होते. शेतीच्या छोट्याशा तुकड्यावर हागे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आई गृहिणी आहे शिवाय कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिवणकामही करतात. आईनं केलेल्या कष्टांचं आज धनश्रीनं यशात रूपांतर केलंय. वाचन आणि संगीत हे दोन जादुई छंद जोपासणाऱ्या धनश्री ला प्रशासकीय सेवेत येऊन समाजासाठी काम करायचे आहे.

Updated : 28 May 2019 7:50 PM IST
Next Story
Share it
Top