Home > रिपोर्ट > भाजप आमदाराची महिला कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजप आमदाराची महिला कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजप आमदाराची महिला कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
X

भाजपचे गुजरातमधील आमदार बलराम खुबचंद थावानी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या नितू तेजवानी यांना सार्वजनिक ठिकाणीच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडलीय.

भाजप आमदार थावानींकडून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या तेजवानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण होतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अहमदाबाद येथील नरोडा विधानसभा मतदारसंघातील आमदार थावानी यांच्याकडे नितू तेजवानी आपल्या विभागातील पाण्याची समस्या घेऊन गेल्या होत्या. मात्र, त्याकाही बोलण्याआधीच आमदार थावानी यांनी नितू यांना लाथाबुक्यांनी मारहाण सुरु केली. खरंतर या मतदारासंघात पाण्याची भीषण समस्य़ा असून याविषयी नितू तेजवानी या आमदाराची भेट घेण्यास गेले असता त्यांनी मारहाण सुरु केली सोबतच काही भाजप कार्यकर्त्यांनी तेजवानी यांच्या पतीलाही मारहाण केली. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेमुळे देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे.

काय म्हणाले आमदार बलराम थवानी..

ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून मोठ्या प्रमाणात ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. सगळीकडून टीकेची झोड उठू लागल्यानंतर भाजप आमदार बलराम थवानी यांनी माफी मागितली आहे. मी भावनेच्या भरात वाहून गेलो. मी माझी चुक स्वीकारतो. गेल्या २२ वर्षापासून मी राजकारणात आहे. मात्र, कधी असं झालं नाही. मी केलेल्या कृत्यावर त्या महिलेची माफी मागतो असं आमदार थावानी यांनी म्हटलंय.

वरील सर्व घटना लक्षात घेता एका महिलेला अशी मारहाण करणं कितपत योग्य आहे.

तसेच नितू तेजवानी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे की, भाजप सरकारच्या काळात महिला किती सुरक्षित आहेत ? असा सवाल केला आहे. त्यामुळं आता मोदी हे अशा आमदारांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न नेटिझन्सनी सोशल मीडियावर विचारायला सुरूवात केलीय.

पाहा हा व्हिडिओ...

https://youtu.be/gosp0LEOIVw

Updated : 3 Jun 2019 8:28 AM GMT
Next Story
Share it
Top