Home > रिपोर्ट > भाजपचा मुंबईत महिला मेळावा

भाजपचा मुंबईत महिला मेळावा

भाजपचा मुंबईत महिला मेळावा
X

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजप सरकार बंगालच्या मुख्यमंत्री ममतां बॅनर्जी यांच्यावर ताशेरे ओढताना दिसत आहे तर भाजपचा मुंबई षण्मुखानंद येथे रविवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विशेष उपस्थिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची राहणार आहे. त्यामुळे मेळाव्याच्या व्यासपीठावरून त्या काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान निवडणुकांच्या दृष्टीकोनातून भाजपचा हा महिला मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.

यावेळी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्य अहवालाचा ई- प्रकाशन देखील होणार आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

Updated : 17 May 2019 6:02 AM GMT
Next Story
Share it
Top