Home > रिपोर्ट > पंकजा मुडेंची नाराजी आता "पोस्टरवर" झळकली

पंकजा मुडेंची नाराजी आता "पोस्टरवर" झळकली

पंकजा मुडेंची नाराजी आता पोस्टरवर झळकली
X

राज्यात निवडणुकीच्यावेळी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद असल्याचा हल्लबोल केला होता. मात्र तीच स्थिती महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वाद आता बाहेर येऊ लागलेत .एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त करत थेट पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला आहे .पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी देखील आपली नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. मात्र आता भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नंतर सर्वात जास्त चर्चा आहे ती भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याकडे. याबाबत पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना

‘इतके दिवस थांबला आहात, तर आणखी एक दिवस थांबा’

असे उत्तर दिले आहे.

उद्या होणाऱ्या या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे, मात्र यामध्ये महत्त्वाचे म्हणजे या मेळाव्याच्या पोस्टरवरून कमळ हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. लावण्यात आलेल्या पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपाचे नाव किंवा कमळाचे चिन्ह नाही. त्याचबरोबर मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेदेखील लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे नक्की कोणती भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Updated : 11 Dec 2019 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top