Home > रिपोर्ट > बारामतीची लेक कांचन कुल होणार का विजयी?

बारामतीची लेक कांचन कुल होणार का विजयी?

बारामतीची लेक कांचन कुल होणार का विजयी?
X

कांचन यांना बारामती मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिलेली आहे. त्या दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. कांचन कुल यांचे वडील हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. त्यांचे माहेर हे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे राणा जगजीतसिंह हे कांचन यांचे चुलत बंधू आहेत. कांचन यांचा राहुल कुल यांच्याशी 2005 साली विवाह झाला. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने राहुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. स्वत:ला बारामतीची लेक आणि दौंडची सून म्हणवणा-या कांचन यांना सुशिक्षित घराण्यातील उमेदवार म्हणून जनमानसाचा मोठा पाठिंबा मिळू शकतो.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात कांचन उभ्या आहेत.

Updated : 20 April 2019 8:30 AM GMT
Next Story
Share it
Top