Home > रिपोर्ट > पाॅवरफुल पंकजा मुंडे?

पाॅवरफुल पंकजा मुंडे?

पाॅवरफुल पंकजा मुंडे?
X

गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळा जमणार आहे. या सभेला पंकजा मुंडेंसह त्यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत. या मेळाव्यात भाजपमध्ये नाराज असलेले नेते वेगळा मार्ग निवडणार की शक्तिप्रदर्शनात भाजपवर दबाव टाकला जाणार, हे पाहणं महत्व्याच ठरणार आहे. याआधी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी ‘इतके दिवस थांबला आहात, तर आणखी एक दिवस थांबा’ असे सूचक वक्तव्य केलं होतं त्यामुळे नेमके आजच्या दिवशी त्या कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

पंकजा मुंडेंची राजकीय वाटचाल

2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला. तो आजतागायत सुरू आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजा यांनी बाजी मारली. डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक ही पंकजा विरुद्ध धनंजय असं चित्र होतं.यंदाही म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच परळीतून सामना रंगला. ज्यात धनंजय मुंडे जिंकले.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2366556166976152/

Updated : 12 Dec 2019 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top