पवार समर्थक तरुणीच्या पाठीशी उभ्या राहिल्या भाजप नेत्या चित्रा वाघ
X
सोशल मीडियावर महिलांवर होणाऱ्या अश्लील स्वरुपातील ट्रोलींगवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) पुन्हा एकदा आक्रमक झाल्या असून महाराष्ट्र पोलिस सायबर विभागाचे उप महानिरिक्षक हरीश बैजल यांना सोशल मीडियावर महिलांवर अश्लील कमेंट आणि टीका टीपण्णी (Social Media Trolling) करणाऱ्या रिकामटेकड्या विकृतांनाही पोलिसीखाक्या दाखवावा अशी मागणी केली आहे.
असाचं इशारा रिकामटेकड्या विकृतांना द्या महिलांविषयी अश्लील आक्षेपार्ह कमेंट लिहीणार्या तसेचं टिका टिपण्णी करणार्या विकृतांवरही तात्काळ कारवाई कराल खरं तर यासाठी सायबरसेल ची निर्मीती झाली पण अजून हवा तसा पोलीसीखाक्या दिसला नाही म्हणून विकृत चेकाळसलेत @DGPMaharashtra @MumbaiPolice https://t.co/IKcHz03S9t
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 9, 2020
पोलिस खात्यावर आक्रमक होताना अशी मागणी करण्यास निमित्त होतं राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या तरुणीवर ट्वीटरच्या माध्यामातून करण्यात आलेल्या अश्लील कमेंटचं. शीतल बनकर नामक तरुणीने आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासोबत झालेल्या संवादाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
अचानक फोन वाजतो आणि समोरून आवाज येतो "ताई रोहित पवार बोलतोय... कसे आहात, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या... कोणतीही गरज भासल्यास हक्काने सांगा ."
आणि समोर आदरणीय पवार साहेबांची मूर्ती उभा राहिली.🙏
हे फक्त पवार कुटुंबचं करू शकत.
मनापासून धन्यवाद @RRPSpeaks दादा 🙏🙏#बारामतीकर
— Shital ... (@shitalbankar333) April 9, 2020
या ट्वीटवर गणेश तौर नामक ट्वीटर अकाऊंट वापरणाऱ्या विकृताने अश्लील कमेंट केली होती. या कंमेंटला उत्तर देताना शीतल यांनी त्यास प्रोफाईल फोटोवर शिवाजी महारांजांचा फोटो ठेवण्याची तुझी लायकी नाही असं म्हणत तो काढण्यास सांगितले.
शीतल बनकर यांच्या ट्वीटला साद देताना चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र सायबर सेलला (Cyber Cell) विनंती करत घरी बसलेल्या रिकामटेकड्या विकृतांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी शीतल बनकर यांनाही चित्रा वाघ यांनी त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं.
राज्याच्या @MahaCyber1 ला विनंती सध्या सगळेचं घरी असल्याने बरेचं रिकामटेकडे विकृत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह अश्लील कमेंट्स महिलांवर करतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा व या विकृतीला वेळीचं आळा घाला.शितल मी आहे तुझ्यासोबत @DGPMaharashtra @MumbaiPolice @PravinAlai @TheRSS_Piyussh https://t.co/kspsx1v8ne
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 9, 2020
दरम्यान, व्हॉट्सएप ग्रुपवरील सर्व एडमीन्सना ग्रुपवर खोट्या बातम्या आणि आणि तणाव निर्माण करणारे संदेश थांबवण्यासाठी ग्रुपमध्ये सहभागी इतर व्यक्तींना प्रतिबंधित करण्याचे आवाहन केलं आहे. व्हॉट्सएपच्या माध्यामातुन असे अफवा पसरवणारे संदेश प्रसारीत झाल्यास एडमीनला जबाबदार धरले जाईल असा इशारा पोलिस उप महानिरिक्षक हरीश बैजल यांनी दिला आहे.
जय हिंद।
मैं हरीश बैजल, पुलिस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र साइबर सभी WhatsApp एडमिन से विनंती करता हूं की वे ग्रुप में फेक न्यूज ना फैलने दे और सिर्फ वेरिफाइड इंफॉर्मेशन का ही प्रचार होने दे|#CyberSafe #MahaCyber #MaharashtraFightsCorona #StoptheRumors @harishbaijal @MahaDGIPR pic.twitter.com/GqJebcrssQ
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) April 8, 2020
यावर चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र सायबर सेलवर निशाणा साधताना “असाचं इशारा रिकामटेकड्या विकृतांना द्या महिलांविषयी अश्लील आक्षेपार्ह कमेंट लिहीणाऱ्या तसेचं टिका टिपण्णी करणाऱ्या विकृतांवरही तात्काळ कारवाई कराल.” अशी मागणी केली. “खरं तर यासाठी सायबरसेल ची निर्मिती झाली पण अजून हवा तसा पोलीसीखाक्या दिसला नाही म्हणून विकृत चेकाळलेत.” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.