Home > रिपोर्ट > पेट्रोल पंपावर सुट्टया पेट्रोलची सर्रास विक्री; महिला अत्याचाराचं हत्यार

पेट्रोल पंपावर सुट्टया पेट्रोलची सर्रास विक्री; महिला अत्याचाराचं हत्यार

पेट्रोल पंपावर सुट्टया पेट्रोलची सर्रास विक्री; महिला अत्याचाराचं हत्यार
X

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. यावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी या मागणीवर विरोधकांनी अधिवेशनात जोर लावून धरला आहे. यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या फेसबुक अकांऊटवरुन घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर सुट्टे पेट्रोल विकले जात असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एकीकडे राज्यात महिलांना जिवंत जाळण्याच्या घटना घडत असताना वारंवार बंदी घालूनही सुट्टे पेट्रोल तसेच ॲसीडसदृश केमिकलची विक्री केली जात असल्याने राज्याच्या महिला सुरक्षेवर हा खुप मोठा प्रश्न आहे.

“राज्यात महिलांना जिवंत जाळण्याच्या घटना घडताहेत यासंदर्भात सुट्टे पेट्रोल तसेच ॲसीडसदृश केमिकल च्या विक्रीवर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी वारंवार करूनही घाटकोपर(पश्चिम )च्या माणिकलाल पेट्रोल पंपवर सर्रास कॅनमध्ये पेट्रोल भरून दिलं जातय” अशी व्हिडीओ पोस्ट चित्रा वाघ यांनी शेअर केली असून यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Updated : 25 Feb 2020 5:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top