Home > रिपोर्ट > भाजप माजी आमदार नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

भाजप माजी आमदार नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

भाजप माजी आमदार नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
X

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर (Mira- Bhayander) महापालिकेतील भाजपच्याच नगरसेविकेने नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तशी तक्रार कोंकण महानिरीक्षकांकडे करण्यात आली होती ज्याची दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

पीडित भाजप नगरसेविकेने तक्रार करताना नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोप केला आहे. नगरसेविकेने याबाबत सुरुवातीला पोलिसात न जाता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्याकडं दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मेहता यांची एक अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, त्यानंतर त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

भाजपा नगरसेविकेने केलेल्या आरोपानंतर माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आईपीसी कलम 376 (2) (n) ,376 (2),496,417,232,504,506,34, तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार कायदा 3(1)(w), अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 3(s), अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायदा 3(2)(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, नरेंद्र मेहता यांच्यावरील गंभीर आरोप यापूर्वी विधानभवनातही चर्चेचा मुद्दा ठरला होता. संबंधित पीडित महिलेने नरेंद्र मेहतांकडून शोषण होत असल्याची तक्रार 2016 मध्ये आणि जुलै 2019 मध्ये अशी दोनवेळा केली. त्यानंतरही पोलिसांनी मेहता यांच्यावर पोलिसांनी का कारवाई केली नाही? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला होता. तर मनीषा कायंदे यांनीही या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेत महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते.

Updated : 28 Feb 2020 12:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top