Home > रिपोर्ट > भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु न देण्याची रुपाली चाकणकरांची धमकी

भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु न देण्याची रुपाली चाकणकरांची धमकी

भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु न देण्याची रुपाली चाकणकरांची धमकी
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन पुन्हा मोठा वाद निर्माण झाला आहे. 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकावर सर्व स्तरांतून चौफेर टीका होत आहे. यावर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट भाजपवर निशाणा साधत त्वरित याबाबत जनतेची माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी या भाजपाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी ताकीद दिली आहे.

"आज के शिवाजी नरेंद्र मोदी, अशी पुस्तिका, नगरचा उपनगराध्यक्ष श्रीपाद छिंदमकडून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, तसेच पाठ्यपुस्तक जिजाऊ माँसाहेबांचा केलेला अपमान यावरून भाजपची छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची वृत्ती दिसून येते. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून घेणारे नरेंद मोदी यांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. छञपती शिवाजी महाराजांची तुलना कोणीही कुणाशीच करू शकत नाही, इतके ते महान आहेत. नरेंद्र मोदी यांना कदाचित महाराजांनी सूरतवर गाजविलेल्या पराक्रमाची सल त्यांना अजून बोचत असावी, म्हणून तसा प्रयत्न करून महाराष्ट्राचा अपमान करण्याची संधी ते शोधत असतात. याप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध तर आहेच परंतु त्यांनी त्वरित याबाबत जनतेची माफीदेखील मागितली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला पदाधिकारी भाजपाच्या कार्यकर्तेला रस्त्यावर फिरू देणार नाही"

असं राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

Updated : 13 Jan 2020 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top