Home > रिपोर्ट > ‘सुजाता’ महोत्सवातून अभिनेत्री नूतन यांच्या आठवणींना उजाळा

‘सुजाता’ महोत्सवातून अभिनेत्री नूतन यांच्या आठवणींना उजाळा

‘सुजाता’ महोत्सवातून अभिनेत्री नूतन यांच्या आठवणींना उजाळा
X

भारतीय चित्रपटाचा इतिहास खूप मोठा आहे. भारतातील लोंक तीन गोष्टींचे चाहते आहेत ते म्हणजे चित्रपट, राजकारण आणि क्रिकेट भारतीय चित्रपटसृष्टीने अनेक मोठे कलाकार दिले आहेत. अश्याच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नूतन यांच्या ८३व्या जयंती निमित्त त्यांच्या महत्व्याच्या चित्रपटांचा महोत्सव ‘नूतन रेट्रोस्पेक्टिव्ह’ २ ते ४ जून पेडर रोड येथे फिल्म डिव्हिजन येथे भरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या सुजाता बिमल रॉय दिग्दर्शित चित्रपटाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाघटन २ जून ला संध्याकाळी ६ वाजता सुजाता या चित्रपटाने होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला नूतन यांचा मुलगा अभिनेते मोहनिश बहल आणि बॉलीवूडमध्ये नुकतेच पाऊल ठेवलेली नात अभिनेत्री प्रानूतन बहल उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या धाकटय़ा बहीण ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा देखील उपस्थित राहणार आहेत.नूतन यांनी जवळ जवळ सत्तरहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या , त्यांच्या वेगळ्या अभिनयामुळे त्या नेहमी चर्चेत राहिल्या. त्यांच्या अभिनयाची त्यांनी वेगळी छाप पाडली होती.

Updated : 25 May 2019 9:09 AM GMT
Next Story
Share it
Top