Home > रिपोर्ट > लॉकडाउन मध्ये तृप्ती देसाईंना दारु खरेदी करताना अटक?

लॉकडाउन मध्ये तृप्ती देसाईंना दारु खरेदी करताना अटक?

लॉकडाउन मध्ये तृप्ती देसाईंना दारु खरेदी करताना अटक?
X

देशभरात लॉकडाउन सुरु असताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना दारू खरेदी करताना पोलिसांनी अटक करतानाचा व्हिडीओ आणि माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सर्वत्र उलटसुलट चर्चा रंगत आहेत. मात्र या व्हिडीओचा खरा प्रकार तृप्ती देसाई यांनी ‘मॅक्सवुमन’ सोबत बोलताना उघड केला आहे.

यासंदर्भात तृप्ती देसाई यांनी आपली भूमिका मांडताना सदरचा व्हिडीओ सप्टेंबर 2019 मधील जुना व्हिडीओ असून मला बदनाम करण्यासाठी चुकीचा मजकूर लिहून सदरचा व्हिडीओ व्हायरल करण्यात येत असल्याचे सांगितले.

दारुबंदी करावी म्हणून तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वात भुमाता ब्रीगेडने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोकळ्या दारुच्या बाटल्यांचा हार घालण्याची तयारी करत होते. यावेळी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना अटक केली होती. या आंदोलनाचे फेक व्हिडीओ बनवून चुकीचे संदेश टाकून लोकांची दिशाभूल केली जात आहे.

फेक व्हिडीओ बनवून समाजसेवा चळवळीतील महिलांचाही अपमान केला जात आहे. या संदर्भात सायबर सेल मध्ये गुन्हा दाखल करणार असून गृहमंत्र्याचीही भेट घेणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलं आहे. यानिमित्ताने तृप्ती देसाई यांच्यासोबत पत्रकार धम्मशील सावंत यांनी केलेली बातचीत...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/163811861445728/

Updated : 3 April 2020 6:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top