Home > रिपोर्ट > सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका "आज देश की हालत, अंधेर नगरी चौपट राजा"

सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका "आज देश की हालत, अंधेर नगरी चौपट राजा"

सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका आज देश की हालत, अंधेर नगरी चौपट राजा
X

‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. यावर आज काँग्रेसनं नवी दिल्ली रामलीला मैदानावर 'भारत बचाव' मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” असं म्हटले. यानंतर काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत कधी कधी देशातील व्यक्ती , देश , समाज यांवर अशी वेळ येते की एक मोठा निर्णय घेण्याची वेळ येते आणि आता त्याच मोठ्या निर्णयाची वेळ देशावर आली आहे. देशाला वाचवायचं असेल तर आपल्याला कठोर संघर्ष करण्याची गरज आहे असं आजच्या सभेत त्या म्हटल्या.

https://youtu.be/57dbIW7M3g8

Updated : 14 Dec 2019 4:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top