- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

दिया जले, जहाँ जले कोरोना पळे..!
X
- भक्ती लोखंडे
आधीच कोरोनाने अख्या जगभरात थैमान घातलंय, त्यात मोदींचा एक एक इव्हेंट प्लॅन सुरू आहे... सगळीकडून टीका होत आहे, 'मोदी पंतप्रधान आहेत की इव्हेंट प्लॅनर' हा अनेकांना पडलेला प्रश्न चुकीचा नाही....
याआधी थाळ्या वाजवायला सांगितल्या आणि दिल्ली ते गल्ली पर्यंत मोदींच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी ते फॉलो केलं... का तर डॉक्टरस्, नर्सेस, पोलिस, पत्रकार यांच्या निस्वार्थ सेवाभावाला सलाम देण्यासाठी... कोणता इव्हेंट म्हणून थाळ्या वाजवल्या नाहीत... किंवा घरात बसून विरंगुळा होण्यासाठी तर अजिबातच नाही, फक्त सेवा करणाऱ्यांच धैर्य वाढवण्यासाठी.
पहिला इव्हेंट सक्सेसफुल झाल्यानंतर, साहेबांनी दुसऱ्या इव्हेंटची घोषणा केली... दिवे लावायची... आपली भारतीय लोकं उत्सवप्रिय जरी असली तरी या वाईट काळात भक्त, मोदी समर्थकच हा थिल्लरपणा करतील... बाकी विज्ञानवादी, तार्किक विचार करणारे दिवे लावणार नाहीत... हे अख्खा देश चालवणाऱ्याला कळलं पाहिजे...
थाळ्या वाजवून झाल्या, आता दिवे लावायला सांगितलं आहे... या अशा परिस्थितीत मोदींना हे सुचतं कसं, की त्यांचा कोण सल्लागार आहे... हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे... ज्यांचा घरचे दिवे विजलेत, ज्यांची जवळची लोकं कोरोनामुळे मृत्यूला कवटाळलेत, जी लोकं 400 किमी पायपीट करत आपल्या घरी परतत आहेत... त्यांना हा इव्हेंट करायला लावणं कितपत योग्य आहे...
आम्हा सगळ्यांना मोदींना हेच सांगायचं आहे... की आम्ही दिवे लावणार नाहीत... आम्हाला टास्क देण्याआधी तुमच्याकडून एक सोशल प्रॉमिस हवं आहे... आणि ते आधी पूर्ण करा... देशाची, राज्याची व्यवस्था सुरळीत करा... कोरोनामुळे येणाऱ्या आर्थिक डबघाईला आम्ही देशवासीयांनी कसं सामोरं जायचं, यावर सोल्यूशन सांगा... हा भारत कोरोनामुक्त कधी होईल ते सांगा, COVID- 19 टेस्ट ची किंमत 4,500 हुन ती निशुल्क कधी होईल ते सांगा... आम्हाला दिवे लावायला सांगण्यापेक्षा यावर तुम्ही चर्चा करावी हीच आमची तुमच्याकडून माफक अपेक्षा आहे..
- भक्ती लोखंडे