या कारणांमुळे मिसेस फडणवीस झाल्या टिकेच्या धनी
Max Woman | 8 Jun 2019 12:19 PM GMT
X
X
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आजवर अनेकवेळा ट्रोल करण्यात आलं. त्यांच्या कलाक्षेत्रातल्या आवडीमुळे त्यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र त्यांच्या पाश्चिमात्य पोशाखावरुन अनेकदा त्यांच्या टिका-टिप्पणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने असं करु नये, तसं करु नये अशा विचारांच्या आपल्या समाजाने त्यांच्याकडे स्वतंत्र्य स्त्री म्हणून पाहिलचं नाही. नेहमी प्रमाणे बाईला कुणाच्या ना कुणाच्या बंधनात बांधून ठेवणाऱ्या समाजाने अमृता फडणवीस यांच्याकडेही त्याच नजरेनं पाहिलं असावं... पाहुयात कोणत्या कारणांमुळे आतापर्यंत अमृता फडणवीस टीकेच्या धनी झाल्या आहेत.
अभिनेता अमिताभ बच्चन सोबत एका गाण्याच्या अल्बममध्ये काम केल्यानंतर त्यांच्यावर टिका-टिप्पणी करण्यात आली.
सौ. टी. सीरिज
https://youtu.be/z3pOIsl-iG0
जहाजाच्या कडेला बसून एक फोटो काढला… खरं स्वत:चा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्याच्या पत्नीनं असा सेल्फी घेणं चुकीचंच… त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली. मात्र, अमृता यांच्या या सेल्फीवर ज्या पद्धतीनं ट्रोल करण्यात आलं… याला कोणती संस्कृती म्हणायचं.
एका कार्यक्रमात मुलगी दिविजासोबत अमृताने दिवानी-मस्तानी गाण्यावर डान्स केला..
https://www.facebook.com/amrutafadnavisofficial/videos/340890440069769/
तर मुंबई रिवर या गाण्यावरुनही अमृता फडणवीस यांना चांगलचं ट्रोल करण्यात आलं होतं.
सौ. टी सीरिज
https://youtu.be/heeghCQPCy4
आणि आता अमेरिकेतल्या म्युझिक शो मध्ये गायलेल्या गाण्याचे फोटो सोशल मीडियावर टाकताच पुन्हा एकदा ट्रोलर गॅंगने ट्रोलिंगला सुरुवात केली आहे.
maxwoman
एकंदरित मिसेस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या पेहराव्यावरुन त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र अमृता यांनी प्रत्येक ट्रोलधाड्यांचा सामना करत स्वतःच्या ठाम आणि परखड भूमिका वेळोवेळी मांडल्या आणि आपल्या कलाक्षेत्रातल्या पॅशनलाही त्यांनी वाव दिला आहे.
Updated : 8 Jun 2019 12:19 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire