नीडर बनो सब अच्छा होगा
Max Woman | 18 March 2019 4:29 PM IST
X
X
लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजल्यानंतर प्रियांका गांधी यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रियांका गांधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखू शकतात असा विश्वास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेस प्रचारात बॅकफूटवर खेळताना दिसतेय. अशा वेळी बदललेल्या परिस्थितीत प्रियांका गांधी काय बोलणार, काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, मात्र मृदूभाषी प्रियांका गांधी यांनी अजूनपर्यंत मोदींवर काहीही भाष्य केलेलं नाही. तरी सुद्धा प्रियांका यांच्या हल्ल्याचा रोख काय असेल हे त्यांच्या एका ट्वीट वरून लक्षात येतंय.
प्रियांका गांधी तीन दिवसांची गंगा यात्रा करणार आहेत. या यात्रेपूर्वी त्यांनी स्वराज भवनच्या आठवणी जागवल्या. प्रियांका गांधी यांनी म्हटलंय की, स्वराज भवनाच्या अंगणात बसून ती खोली पाहतेय, ज्यात माझ्या आजीचा जन्म झाला होता. रात्री झोपवताना आजी मला झोन ऑफ आर्कच्या गोष्टी सांगायची. आज पण माझ्या कानात ते शब्द घुमतात.. ती म्हणायची – नीडर बनो और सब अच्छा होगा.
प्रियांका गांधी यांच्या या वाक्यांवरून त्या पुढे काय करणार आहेत, याचा अंदाज दिसून आलाय.
स्वराज भवन के आँगन में बैठे हुए वह कमरा दिख रहा है जहाँ मेरी दादी का जन्म हुआ। रात को सुलाते हुए दादी मुझे जोन ऑफ आर्क की कहानी सुनाया करती थीं। आज भी उनके शब्द दिल में गूँजते हैं। कहती थीं- निडर बनो और सब अच्छा होगा। pic.twitter.com/q8Ecdb2RsL
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 17, 2019
Updated : 18 March 2019 4:29 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire