निवडणुका सुरु होण्याच्या एक आठवडा अगोदर देशभरातील लाखो महिलांनी मोदी सरकारविरोधात मोर्चा काढला. पुन्हा हे सरकार आलं तर महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समानता मिळणार नाही. तसेच गेल्या पाच वर्षात महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून यावर कोणतीही ठाम उपाययोजना करण्यात आली नाही. अनेक महिला बेरोजगार झाल्या आहेत. देशभरातील २० राज्यातून हा मोर्चा निघाला होता. तसेच दिल्लीच्या जंतरमंतरवर महिलांनी हा मोर्चा करत प्रवेश केला. आझादी लेकर रहेंगे चे नारे यावेळी देण्यात आले असून या मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्ते, विद्यार्थी आणि व्यवसायिकांचा समावेश होता.
Updated : 5 April 2019 6:47 AM GMT
Next Story