हिंगणघाटची पुनरावृत्ती, औरंगाबादेत 50 वर्षीय महिलेला बारचालकाने घरात घुसून जाळलं
Max Woman | 5 Feb 2020 3:35 AM GMT
X
X
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला भरचौकात जाळल्याची घटना ताजी असताना औरंगाबादमध्ये या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात ही घटना घडली आहे. ही महिला 95 टक्के भाजली असून तिच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पीडित महिला रविवारी रात्री 11 वाजता घरी एकटीच असताना ही घटना घडली. रात्री ही महिला घरी एकटीच होती. यावेळी हा आरोपी तिच्या घरात घुसला. इतक्या रात्री घरी येण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावरुन आरोपीन तिच्यावर पेट्रोल ओतून जीवंत जाळलं.
दरम्यान पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयाने आरोपी संतोष मोहितेला 10 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Updated : 5 Feb 2020 3:35 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire